काकडीचे धोंडस (kakdiche dhondas recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ks1
#कोकण स्पेशल काकडीचे धोंडस

हा एक कोकणी पारंपारिक पदार्थ आहे काकडी गुळ व रव्या पासून एक असा मस्त गोड पदार्थ आहे चवीला खूप छान लागतात चला तर मग बघुया काकडीचे धोंडस

खूप छान चवदार व स्वादिष्ट असे हे धोंडस लागतात

काकडीचे धोंडस (kakdiche dhondas recipe in marathi)

#ks1
#कोकण स्पेशल काकडीचे धोंडस

हा एक कोकणी पारंपारिक पदार्थ आहे काकडी गुळ व रव्या पासून एक असा मस्त गोड पदार्थ आहे चवीला खूप छान लागतात चला तर मग बघुया काकडीचे धोंडस

खूप छान चवदार व स्वादिष्ट असे हे धोंडस लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
चार-पाच
  1. 3काकड्या
  2. 1 वाटीरवा
  3. 1 वाटीगुळ
  4. 2 चमचेफुटाण्याची डाळ (डाळव)
  5. 1 वाटीओल्या नारळाचा चव
  6. 1वेलची
  7. चिमुटभरमीठ
  8. 1/2 टेबलस्पूनहळद
  9. 2 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे

  2. 2

    एक कढई घेऊन गॅसवर ठेवावी त्यात दोन टेबलस्पून तूप घालून रवा भाजून घ्यावा रवा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यावा

  3. 3

    काकडी स्वच्छ धुऊन किसून घ्यावी नंतर एक भांडे घेऊन त्यात काकडीचा कीस, ओल्या नारळाचा चव टाकावा गूळ टाकून घ्यावा फुटाण्याची डाळ टाकावी वेलची सोलून टाकावी अर्धा टीस्पून हळद घालावी चिमूटभर मीठ घालून घ्यावे व हे भांडे गॅस वर दहा मिनिटांसाठी ठेवावे म्हणजे सर्व एकत्र होऊन छान पाक तयार होतो

  4. 4

    पाक जास्त घट्ट करू नये फक्त सर्व जिन्नस वितळून घ्यावे आता यात भाजलेला रवा घालून घ्यावा

  5. 5

    रवा घातल्यानंतर गॅस मंद आचेवर करून घट्ट होईपर्यंत हलवून घ्यावे

  6. 6

    एक जाड बुडाचे भांडे घेऊन त्याला तूप घेऊन ग्रीस करून घ्यावे नंतर वरील मिश्रण त्या भांड्यात घालून वाटीने किंवा हाताने थापून घ्यावे

  7. 7

    नंतर हे भांडे अगदी मंद आचेवर गॅस वर ठेवावे त्यावर झाकण ठेवून झाकणावर जड वस्तू ठेवून घ्यावी म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही अगदी पाच मिनिट गॅस वर ठेवावे नंतर गॅस बंद करून ठेवावा

  8. 8

    हे भांडे असेच रात्रभर ठेवून द्यावे नंतर एका ताटलीत काढून त्याच्या छान वड्या पाडून घ्याव्या

  9. 9

    आता या वड्या एका प्लेटमध्ये टाकून खाण्यासाठी द्याव्या यालाच कोकणात धोंडस असे म्हणतात खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या (3)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
ओल्या नारळाचा चव कधी घालायचा ते लिहिलं नाही तुम्ही..

Similar Recipes