आंबोळी (amboli recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#KS1 #आंबोळी # एक साधा सोपा, कमी सामग्री मध्ये होणारा कोकणी पदार्थ... हा तुम्ही चटणी सोबत खा, किंवा चहा सोबत... कसाही चांगलाच लागतो..

आंबोळी (amboli recipe in marathi)

#KS1 #आंबोळी # एक साधा सोपा, कमी सामग्री मध्ये होणारा कोकणी पदार्थ... हा तुम्ही चटणी सोबत खा, किंवा चहा सोबत... कसाही चांगलाच लागतो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 मि
  1. 3 वाट्यातांदूळ
  2. 1 वाटीउडीद डाळ
  3. 1 टीस्पूनमेथी दाणे
  4. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

4 मि
  1. 1

    तांदूळ व उडीद डाळ निवडून, स्वच्छ धुवून, 7-8 तास पाण्यात भिजत घालावी.

  2. 2

    त्यानंतर तांदूळ आणि डाळ उपसून घ्यावे. तांदूळ किंचित रवाळ वाटून घ्यावे. उडीद डाळ मात्र छान बारीक वाटून घ्यावी. वाटताना गरज पडल्यास थोडे पाणी टाकावे. आता वाटलेले डाळ तांदूळ एका भांड्यात एकत्र करावे.

  3. 3

    आता तयार झालेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ टाकावे. मिक्स करून घ्यावे. आणि गरम जागेवर 7-8 तास झाकून ठेवावे. त्यानंतर 7-8 तासांनी आंबोळी तयार करण्यासाठी, पीठ तयार आहे. आता त्यात आवश्यकतनुसार पाणी टाकावे.

  4. 4

    गॅसवर तवा ठेवून गरम करावा. त्यानंतर त्यावर चमच्याने पीठ टाकावे. आणि झाकण ठेवावे. 1 मिनिटांनी झाकण उघडून बघावे, छान जाळी पडलेली दिसेल. परतवून दुसऱ्या बाजूने ही शेकून घ्यावे. अशाप्रकारे सर्व आंबोळ्या तयार करून घ्याव्यात. चटणी सोबत, किंवा चहा सोबत सर्व्ह कराव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes