मालवणी चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)

Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
Andheri

#KS1
ही रेसिपी मला माझ्या शेजारी असलेल्या कोकणी ताईंनी दाखवली आहे . हि रेसिपी माझ्या घरात सर्व जणांना खूप आवडते.

मालवणी चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)

#KS1
ही रेसिपी मला माझ्या शेजारी असलेल्या कोकणी ताईंनी दाखवली आहे . हि रेसिपी माझ्या घरात सर्व जणांना खूप आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मी
3 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमबोनलेस चिकन
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1 टेबलस्पूनमालवणी मसाला
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  6. 3 टेबलस्पूनतेल
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी आवश्यकतेनुसार
  9. वाटणासाठी
  10. 15लसुण पाकळ्या
  11. 1 इंचआले
  12. 2हिरव्या मिरच्या
  13. 1/4 कपभाजलेले सुके खोबरे
  14. 1/2 कपकोथिंबीर

कुकिंग सूचना

45 मी
  1. 1

    प्रथम आपण वाटण तयार करून घ्यावे. पहिले वाटण आले, लसून व मिरची यांचे करून घ्यावे.मग दुसरे वाटण कोथिंबीर व भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे करून घ्यावे.

  2. 2

    नंतर एका कढईला गरम करून त्यामध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा घालावा. कांदा गुलाबीसर झाल्यावर त्यामध्ये तयार केलेले पहिले वाटण घालावे. वाटण घातल्यावर त्याला चांगले लालसर होईपर्यंत भाजावे.

  3. 3

    वाटण लालसर झाल्यावर त्यामध्ये मालवणी मसाला, हळद घालावी व त्याला 2 मिनिट एकत्र करून घ्यावे. मग त्यामध्ये चिकन घालून चांगले एकत्र करून घ्यावे व त्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्यावे या प्रोसेस मध्ये त्याला जो पाणी सुटेल त्या पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवायचे आहे.

  4. 4

    दहा ते पंधरा मिनिटं नंतर चिकन वरील झाकण हटवावे. मग त्यामध्ये आपण तयार केलेले दुसरे वाटण घालून त्या वाटण्याचे थोडे पाणी घालून त्यामध्ये मीठ घालून ते चांगले सुके होण्यासाठी ठेवावे.अशाप्रकारे हे चिकन आपण भाकरी, चपाती,भाता सोबत खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
रोजी
Andheri

टिप्पण्या

Similar Recipes