सोलापूर स्पेशल भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

Vaishali Dipak Patil
Vaishali Dipak Patil @vaishu

#KS2
भरली वांगी हा खाद्य पदार्थ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बनविला जातो,महाराष्ट्रात विविध प्रदेशांत निरनिराळे मसाले घरी तयार केले जातात आणि एकच पदार्थ निरनिराळ्या महाराष्ट्रीयन थाळीत वेगळ्या रुचीचा बनतो! म्हणून ही all time favourite dish आपण आज सोलापुरी पद्धतीने तयार करुया...

सोलापूर स्पेशल भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

#KS2
भरली वांगी हा खाद्य पदार्थ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बनविला जातो,महाराष्ट्रात विविध प्रदेशांत निरनिराळे मसाले घरी तयार केले जातात आणि एकच पदार्थ निरनिराळ्या महाराष्ट्रीयन थाळीत वेगळ्या रुचीचा बनतो! म्हणून ही all time favourite dish आपण आज सोलापुरी पद्धतीने तयार करुया...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मी.
2 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅम हिरवी ताजी वांगी
  2. 1 वाटीशेंगदाणे
  3. 2कांदे बारीक कापलेले
  4. 10-12 लसूण पाकळ्याया
  5. 1 तुकडाआले
  6. 1/2 चमचाजीरे
  7. 1 चमचालाल तिखट
  8. 1/2 चमचामोहरी
  9. चिमुटभरहिंग
  10. 1/2 चमचाहळद
  11. 1टोमॅटो बारीक कापलेला
  12. 1-2 हिरवी मिरची
  13. कोथिंबीर आवडी नुसार
  14. मीठ चवीनुसार
  15. 1 चमचाधणे पावडर

कुकिंग सूचना

20मी.
  1. 1

    सर्वप्रथम वांगी धुवून मध्ये चिर पाडून कापून घ्यावी. देठ कापू नये,त्याना मिठाच्या पाण्यात भिजवून घ्यावे.

  2. 2

    आता एका कढईत शेंगदाणे भाजुन घ्यावे. थंड होऊ द्यावे साल काढून आणि नंतर शेंगदाणे,लसूण पाकळ्या,आले, इ. मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यावे. पाणी घालू नये.

  3. 3

    आता तयार मसाला थोडे मीठ घालून वांग्यात भरून घ्यावा. उरलेला. मसाल्यात पाणी घालून घ्यावें त्यात खोबरे काप, थोडा कांदा आणि एक हिरवी मिरची घालावी आणि मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यावे.

  4. 4

    आता एका कढईत तेल तापवून त्यात जीरे मोहरी हिंग चिमूटभर घालुन त्यात बारीक कापलेला कांदा घालून परतावे. नंतर त्यात उरलेला मसाला घालावा.

  5. 5

    मसाला छान शिजू द्यावा. त्यात लाल तिखट, हळद,धने पावडर, इ.घालावे.तेल सुटले की त्यात बारीक कापलेला टोमॅटो घालून परतावे.

  6. 6

    टोमॅटो छान मऊ शिजवून घ्यावा. आता वांगी घालून परतावे आणि त्यात थोडे मीठ घालून झाकून ठेवावे. मंद आचेवर 8 ते 10मि.शिजू द्यावे.

  7. 7

    मस्त सोलापूर स्पेशल भरली वांगी तयार आहेत कोथिंबीर घालून गरमागरम वांगी चपाती बरोबर सर्व्ह करावी.

    🙏🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaishali Dipak Patil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes