सांबार वडी / पुडाची वडी (sambhar wadi recipe in marathi)

सांबार वडी / पुडाची वडी (sambhar wadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेणे. आता पारीचे आणि स्टफीन्ग चे सगळे साहित्य काढून घेणे.आता खोबरे, तीळ, खसखस हे सोनेरी रंगवार भाजून घेणे.
- 2
आता वरील आवरण बनवण्यासाठी एका बाउल मध्ये बेसन पीठ आणि मैदा घेणे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट व हळद, ओवा घालून घेणे. आता यामध्ये गरम केलेले तेल घालून एकत्र करणे. थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घेणे.
- 3
स्टफीन्ग बनवण्यासाठी.... गॅस कढई ठेवून त्यामध्ये तेल घालावे. गरम झाले कि जीरे घालून घेणे. आता यामध्ये मिरचीचे तुकडे,तीळ, खसखस, हळद घालून परतून घेणे. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेणे. भाजलेले खोबरे व शेंगदाणा कूट घालून छान परतून घेणे. चवीनुसार मीठ,लाल तिखट, चारोळे, बेदाणे घालून छान 2/3 मिनिटे हे स्टफीन्ग परतून घेणे.मस्त स्टफीन्ग तयार झाले आहे.
- 4
आता वडी बनवण्यासाठी भिजून घेतलेले पीठ छान मळून घेऊन त्याचे छोटे छोटे एकसारखे गोळे करून घेणे. त्यातील एक गोळा घेऊन त्याची खूप पातळ ही नाही आणि खूप जाड ही नाही अशी पुरी लाटून घेणे. आता याच्या मध्ये चमचाभर तयार केलेले सारण घालावे.
- 5
आता ही पारी सगळ्या बाजूने बंद करून घेणे. बंद करताना थोडे थोडे पाणी लावून बंद करावे म्हणजे ती सगळ्या बाजूने चिकटली जाते. व तळताना आतील सारण बाहेर येत नाही.
- 6
आता वरील प्रमाणे सगळे वडी बनवून घेणे. गॅस वर कढई ठेवून त्यात तळण्यासाठी तेल घालावे. तेल गरम झाले कि बारीक गॅस करून छान खरपूस तळून घेणे. मस्त टेस्टी पुडाची वडी तयार होते.
- 7
गरम गरम पुडाची वडी सॉस किंवा हिरवी चटणी सोबत सर्व्ह करावे.
- 8
Similar Recipes
-
-
नागपूरची स्पेशल सांबार वडी किंवा पुडाची वडी (sambhar vadi recipe in marathi)
#KS3 post 1#थीम ३-विदर्भआमच्या नागपूरला सांबार वडी ही खूप प्रसिद्ध आहे. कोथिंबिरीला नागपूरमध्ये सांबार असे म्हणतात. सांभार वडी ही पारंपरिक रेसिपी आहे. हिवाळ्यामध्ये हमखास ही घरोघरी केली जाते. यामध्ये चे पदार्थ वापरले जातात त्यामुळे माणसाला एक प्रकारची ऊर्जा मिळते किंवा एनर्जी मिळते. सांभार वडी हा एक पदार्थ नसून तो आरोग्यदायी असा पदार्थ आहे. चवीला अतिशय सुंदर चवदार चविष्ट झणझणीत अशी पुडाची वडी किंवा सांबार वडी.माझ्या आईकडून मी शिकलेली सांबारवडी चला तर मग बघुया Vrunda Shende -
नागपुरची सांबार वडी/ पुडाची वडी/ खमंग आणि खुसखुशीत सांबार वडी (sambhar vadi recipe in marathi)
# KS3# नागपुरची सांबार वडीझटपट आणि खमंग खुसखुशीत अशी होणारी सांबारवडी.... Gital Haria -
सांबार वडी (sambar wadi recipe in marathi)
#GR#सांबार वडीविदर्भाची ओळख आणि विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये माना चे स्थान प्राप्त असणारी अशी ही पारंपरिक रेसिपी आहे....नागपुर कडे याचा पाहुणचार मोठा मोलाचा मानला जातो कोथिंबीर लाच विदर्भात सांबार म्हंटला जातो.....जेवणात श्रीखंड,सांबार वडी म्हणजे मोठी पार्टी असते.आजकाल बाहेरही उपलब्ध असते.पण घरी केलेल्या सांबार वडीची चवच न्यारी.... हिला बऱ्याच नावाने ओळखल्या जाते सांबार वडी,कोथिंबीर वडी,पुडा ची वडी असेही म्हणतात या सोबत श्रीखंड विशेष असतेच....नसेल तर तळलेल्या हिरव्या मिरच्या,झणझणीत ताकाची मिरचीचा खर्डा घातलेली चटणी सोबत सर्व्ह करतात.आणि हो... ही सांबार वडी दुसऱ्या दिवशी खूपच छान लागते..हा माझा अनुभव... जरा वेळ खावू पदार्थ याला म्हणतात पण मन भारावून टाकणारा पदार्थ आहे...हिवाळ्यात घरोघरी केल्या जातो. Shweta Khode Thengadi -
अमरावती स्पेशल सांबार वडी (sambhar wadi recipe in marathi)
महाराष्ट्राच्या विदर्भातील खास सांबार वडी त्यातही अमरावतीची स्पेशल सांबार वडी थोडी आंबट-तिखट थोडी गोड अशी ही खमंग वडी नक्की करून बघा.Ashwini Pethkar
-
पुडाची वडी (pudachi vadi recipe in marathi)
#md # पुडाची वडी # माझ्या आईच्या हातची खूप छान होते ही वडी.. हिवाळा आला की कोथिंबिरीचा सुकाळ.. आणि मग पुडाची वडी करायचे हे ठरलेले! आताही आम्ही गेलो तिची पुडाच्या वडीची तयारी असतेच ..मग ते मुलाबाळांसाठी असो किंवा नातवासाठी 😋 अशी हि वडी मी आज तिच्यासाठी केली आहे, मातृदिनाच्या निमित्ताने.. Varsha Ingole Bele -
-
पुडाची वडी (सांबार वडी) (Pudachi vadi recipe in marathi)
ही विदर्भातील एक पारंपरिक पदार्थ आहे. घराघरात पुडाची वडी बनवली जाते. अतीशय चटपटीत पदार्थ आहे Mrs.Nilima Vijay Khadatkar -
पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबार वडी (No Garlic, No onion) (Sambhar Vadi Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसीपी#पुडाची वडी#कोथिंबीर वडी#सांबार वडी Sampada Shrungarpure -
सांबार वडी अर्थात पुडाची वडी (sambar wadi recipe in marathi)
#GR #गावरान की वर्ड--सांबार वडी..काळी माती निळं पाणी हिरवं शिवार...काळ्या काळ्या मातीचा या भुईला हा भार..काय मग उभं राहिलं ना डोळ्यासमोर गावाचं चित्र..तर अशी ही गावातील संस्कृती, खेड्यांमधील संस्कृती आपल्या चित्रपटातून,बॉलिवूडमधून,गाणी,कविता,लोकगीते,कथा,कादंबर्या,लोककला,हस्तकला,शिल्पकला,चित्रकला,ननृत्य, इत्यादी ६४ कलांमधून ही संस्कृती जपण्याचा ,संगोपन,संवर्धन करण्याचा प्रयत्न कायम केला जातोय..तर यामध्ये खाद्यसंस्कृती कशी पिछाडीवर असेल बरं..आपल्या खास *गावरान* या शब्दाच्या अंतर्गत सारं काही अस्सल ,गाँव के मिट्टी की खुशबू वालं सगळं समाविष्ट केलंय. गावरान शब्द उच्चारला की चिंच,बोर,कैर्या हा पार तोंडाचा धबधबा करणारा गावरान मेवा हजर डोळ्यासमोर..पाठोपाठ काळी,लाल माती,एखादं शांत मंदिर,तिथे वाजणारी घंटा ,टुमदार कौलारु घर,अंगण,परसदार,पडवी,गोठा,माजघर,ओसरी,माडी,तुळशी वृंदावन,विहीर, घरातलाच पाणी काढायचा आड,देवघर,आणि चूल हे सगळं शहरीकरणामुळे मनाच्या कप्प्यातून डोकावतं बाहेर..😀आणि मन चुलीकडे धाव घेतं..चूल आणि वैल चूल....तर असे हे लाकडांच्या निखार्यांवरच्या म्हणजेच चुलीवरची खमंग गरमागरम भाकरी,झुणका,पिठलं,खरडा,ठेचा,कांदा,गुळ ,माठातलं गार पाणी...सुखाने परिसीमा गाठून आनंदाची बरसातच हो..😍...यातच मग निसर्गाच्या सानिध्यातली हुरडा पार्टी,भरीत पार्टी आलीच की..प्रत्येक प्रांतातील signature गावरान पदार्थ आलाच..अगदी पानगी,पातोळ्या,घावन,पाटवड्या,मासवड्या,सांबारवड्या,शेंगोळे, धपाटे,कोळाचे पोहे,पालेभाज्या,कढी गोळे,शेवभाजी,डुबुकवडे,आख्खा मसूर,तोंडी लावणी,कापण्या,तेलच्या,वडा भात,डांगर,फोडणीची मिरची,मेतकूट, सांडगी मिरची,फणसाची भाजी,वालाचं बिरडं.,चुलीवरचं चिकन,मटण,कडकनाथ...हे आणि असे..यादी न स Bhagyashree Lele -
-
-
पुडाची वडी (pudachi wadi recipe in marathi)
#thanksgivimg#cooksnap#DeepaGad#सांबार वडी/पुडाची वडीमी दिपा गाड यांची रेसिपी cooksnap केलीत्यांची रेसिपी बघून त्यात थोडा बदल करून केलीय थँक्स ताई मला बघून करावीशी वाटली नि तुम्ही मदत केलीत म्हणून Charusheela Prabhu -
पुडाची वडी(सांबार वडी)
पुडाची वडी तशी हिवाळ्यात करणार पदार्थ ,कारण हिवाळ्यात कोथिंबीर(सांबार) छान मिळतो,हिरवा मटार असतो ,पण आता तसे राहिले नाही,मला आता सुद्धा कोथिंबीर तेवढाच छान, बारीक पानांचा,थोडे फुले असलेला मिळाला आणि माझ्यात कोथिंबीर वडी करण्याचा उत्साह संचारला,मग काय सर्व साहित्य होतेच घरी,आणि आवडीने खाणारे सुद्धा घरीच होते,लागली कामाला.अनघा वैद्य
-
सांबार वडी (Sambar Wadi Recipe in Marathi)
#KS3काही पदार्थ जसे त्या त्या प्रदेशाची खासियत असतात तसेच काही पदार्थांबरोबर काही आठवणी जोडलेल्या असतात. सांबार वडी किंवा पुडाची वडी ही विदर्भातील खासियत तर आहेच पण माझे ह्या वडीशी आठवणींचे नाते आहे. ही वडी मला माझ्या आज्जे सासुबाईंनी शिकवली. त्या अतिशय सुगरण तर होत्याच पण वयाच्या 80 व्या वर्षीही नविन पदार्थ शिकण्याची हौस ही त्यांना होती. त्या विदर्भातील नव्हत्या पण ही रेसिपी त्यांनी शिकवल्यानुसारच करत आले मी.😊 Anjali Muley Panse -
नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi)
#HV .. हिवाळा म्हटलं की हिरव्या पालेभाज्यांची मजा .. याच वेळेस मिळणाऱ्या छान पालेगळ सांबार किंवा कोथिंबीरच्या वड्या प्रत्येक घरी व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्रभर सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी करण्याची पद्धत वेगवेगळी. आज दिलेल्या रेसिपी मध्ये ही नागपूरची सांबारवाडी .. सोबत कढी सर्व्ह करण्याची पद्धत आहे इकडची. अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ही.. आणि आज मी केलेली आहे बिना कांदा लसणाची . तेव्हा बघूया. Varsha Ingole Bele -
धोप्याच्या पानाची वडी (अळुवडी) (alu wadi recipe in marathi)
#Ks3 विदर्भ स्पेशल धोप्याच्या पानाची खमंग वडी खासीयत Suchita Ingole Lavhale -
-
सांबार वडी (पुडाची वडी) (sambhar vadi recipe in marathi)
#KS3 वैदर्भिय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भियांचा आदरातिथ्य गुण तर सर्वश्रृतच आहे. येथील बोली भाषा पण वेगळी आहे. विदर्भाच्या खासियत असलेल्या ह्या सांबार वडीची ही रेसिपी मी आज सादर करणार आहे...ह्या रेसिपीत प्रामुख्याने कोथिंबीरीचा वापर होतो, विदर्भात कोथिंबीरीला सांबार असे म्हणतात...आता ही सांबार वडी कशी करायची हे मी तुम्हाले सांगते, त्याचबरोबर कशी खायची ते पण तुम्हाले सांगते..ह्या वडीसोबत चटणीची तशी काही गरज नसते, खट्टया छाससोबत पण खाल्ली तरी चालते.. Shilpa Pankaj Desai -
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
ही रेसिपी मी पल्लवी पारटे यांची कूकस्नॅप केली आहे. ह्या वडी ला विर्दभाकडे सांबरवडी असे म्हणतात. खूप दिवस झाले मला ही वडी करायची होती. कूकपॅडमुळे संधी मिळाली. Sujata Gengaje -
नागपुरी सांबार वडी (nagpuri sambhar wadi recipe in marathi)
विदर्भात कोथिंबीरीला सांबार म्हणतात.तिथल्या लोकांची ही खासियत आहे.चवीला अप्रतिम लागते.मेहनत मात्र घ्यावी लागते.खाल्ल्यावर मात्र केलेल्या कष्टाचे सार्थक झाले असे वाटते. Pragati Hakim -
सांबार वडी (sambar wadi recipe in marathi)
सांबार,कोथिंबीर दोन्ही एकच. काही भागात या दोन नावाने ओळखली जाते. इच्या शिवाय एकही तिखट पदार्थ छान होत नाही. आणिडीश ची सजावट करण्यात तर ही पटाईत.सांबार वडी म्हणजे माझ्या माहेर ची आठवण.अमरावती फेमस डिश... सांबार वडी Anjita Mahajan -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#WK1# विंटर स्पेशल रेसिपीहिवाळ्यात छान हिरवीगार, गावरान कोथिंबीर मंडईमध्ये दिसू लागते.गावरान कोथिंबीर ला छान चव असते.कोथिंबीर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.कोथिंबीर वडी खूप चविष्ट होते. चला कृती बघूया.. Rashmi Joshi -
नागपूर स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपूर ला कोथिंबीर वडीला सांबार वडी म्हणतात. कोथिंबीर वडी सगळ्यांना खूप आवडते नागपूरला घरी पाहुण्यांसाठी कोथिंबीर वडी स्पेशल असते. माझा घरी सगळ्यांना खूप आवडते. मी तर वडी झाल्यावर नैवद्य ला एक बाजूला काढून ठेवते आणि गरमागरम कोथिंबीर वडी खायला सुरू करते. Sandhya Chimurkar -
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1 #कोथिंबीर_वडी ...#पाटोडी #सांभारवडी ..#विदर्भ स्पेशल सांभार वडी ...आमच्या नागपूरची स्पेशल सांभारवडी ... Varsha Deshpande -
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14मी विदर्भाची आहे तर विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी बनवली आहे, अळू वडी किंवा कोथिंबीर वडी थीम मध्ये मला अळू वडी बनवायला नाही जमले तर मी कोथिंबीर वडी बनवली आहे, आधी विचार केला काही तरी नवीन ट्राय करून पाहते, मिठाईच्या दुकानात मिळतात तशी कोथिंबीर वडी, मी लहानपणी खूपदा पाहिले आहे पण कधी टेस्ट नाही केली, मग विचार आला कोथिंबीर वडी तर आपल्या विदर्भाची खासियत आहे, तर चला तीच बनवून मैत्रिणीनं बरोबर शेअर करूया. ही वडी नागपुरात कढी बरोबर खाली जाते, पाहुणे आले की पाहुणचार मध्ये आम्ही अशी कोथिंबीर वडी नेहमी बनवतो. माहेरी गेले की माझी मम्मी नेहमीच गरम गरम कढी आणि कोथिंबीर वडी चा नाश्ता बनवते. Pallavi Maudekar Parate -
नागपुर स्पेशल वडी वांग्याची भाजी (vadi vangyachi bhaji recipe in marathi)
#ks3#विदर्भनागपुर स्पेशल वडी वांग्या ची भाजीउन्हाळा आला की उन्हाळात मूग डाळीची वडी उडदाची वडी आणि पापड, कुरडया ,शेवया, सरगुंडे असं वर्षभरासाठी साठवून ठेवतो उन्हाळ्यात भाजीचा खूप विचार येतो ,आणि तेव्हा हे वड्या ची भाजी नागपूरला खरोखरी असते, नागपूरला लग्नात पण हळदीचा जेवणाला वडी वांग्याची भाजी असते, चला बघूया वडी वांग्याची भाजी ची रेसिपी Mamta Bhandakkar -
पुडाची कोंथीबीर वडी (Pudachi Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#GR2#गावरान रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिवाळ्यात शेतात भरपूर प्रमाणात सांबार मिळतो सांबार वडी ,पुडीची कोंथीबीर वडी करतात 🤪 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या (3)