पंगतीतील  वांगे बटाटा रस्सा भाजी (vange batata rassa bhaji recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#KS3
#विदर्भ
विदर्भामध्ये आधी कुठेही लग्न असले की घरीच आचारी लावून स्वयंपाक केला जायचा .पंगती बसवल्या जायच्या.आणि स्वयंपाक देखील किती रुचकर, साधा सोपा आणि मन तृप्त करणारा असायचा.. त्यातील मेनू आजकालच्या मेनू सारखे नसले तरी,लग्नातील भाजी आणि तिही वांगी आलूची त्याच्यासोबत कढी, जिलेबी, साधा वरण भात, मसाले भात आणि झालेच तर कधी कधी कुठल्या कुठल्या लग्नकार्यात भजे देखील असायचे. इतके साधे जेवण राहत होते तरीही पंगतीवर पंगती उठायच्या.. आणि मुख्य म्हणजे पत्रावळी मधील सर्व पदार्थ चाटून पुसून संपलेले असायचे..
हे जरी आता मागे पडले असले तरी त्यातील एक मेनू असूनही आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात बनविला जातो आणि तो म्हणजे *पंगतीतील वांगे आलूची रस्सा भाजी*.. कधीही कुठेही ऑल टाइम फेवरेट असलेली विदर्भ स्टाइल वांगे आलू ची भाजी तेवढ्याच हक्काने हजेरी लावते...
माझ्या घरी माझ्या अहोना आणि मला देखील प्रचंड आवडणारी ही भाजी.... 😋
तेव्हा चला करूया मग लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी टेस्टी चमचमीत वांगी बटाटा रस्सा भाजी.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 3-4मध्यम आकाराचे वांगी
  2. 2मध्यम आकाराचे आलू
  3. 2 टेबलस्पूनअद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट
  4. 1मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1-2मोठी कांदे बारीक चिरलेले
  6. 2 टेबलस्पूनभाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
  7. 2 टेबलस्पूनतिखट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनजिरापावडर
  10. 1.5 टेबलस्पूनधनेपावडर
  11. 1.5 टेबलस्पूनगरम मसाला
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. 5-6कढीपत्त्याची पाने
  14. मीठ चवीनुसार
  15. पाणी आवश्यकतेनुसार
  16. 5-6 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    वांगी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. एका वांग्याच्या चार ते सहा फोडी होती एवढ्या आकाराच्या त्या चिराव्यात. जास्त लहान काप करु नये. आलू चे साल न काढता त्याचे देखील मोठे काप करून घ्यावे व पाण्यामध्ये डुबवून ठेवावे.

  2. 2

    पॅनमध्ये तेल घ्यावे. तेल चांगले गरम झाले की, त्यात मोहरी घालावी. मोहरी चांगली तडतडली की, त्यात चिरलेला कांदा घालावा. कांदा एक मिनिट लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात आले लसूण कोथिंबीर ची पेस्ट घालावी. एक मिनिट होऊ द्यावी.

  3. 3

    आता यामध्ये तिखट,धने पावडर, जीरे पावडर, हळद घालून चांगले मिक्स करून घ्यावे. व यात चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता घाला व मिक्स करून एक मिनिट झाकण ठेवून होऊ द्यावा. त्यानंतर त्यात चिरलेले आलू घालून, मिक्स करून 2-3 मिनिटे झाकण ठेवून होऊ द्यावे.

  4. 4

    आलू थोडे शिजले की त्यात चिरलेले वांगे घालावे. मीठ घालावे व चांगले मिक्स करून, वांगे व बटाटे पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यावा पाणी न टाकता. (वांगे आलू जेवढे तेलात शिजतील तेवढी भाजी रुचकर,.तर्रीदार बनते.)

  5. 5

    आलू वांगे, 80% शिजल्यानंतर त्यात दाण्याचा कूट,आवश्यकतेनुसार पाणी, गरम मसाला घालावा व चांगले मिक्स करून भाजीला उकळी येऊ द्यावी व झाकण ठेवून चार ते पाच मिनिटं ही भाजी शिजू द्यावी.

  6. 6

    भाजी शिजल्यानंतर झाकण काढून, वरून कोथिंबीर घालावी व गरम गरम चपाती सोबत वाफाळलेल्या भातासोबत, *पंगतीतील वांगे आलूची रस्सा भाजी*.. सर्व्ह करावी... 💃 💕

  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

Top Search in

टिप्पण्या (2)

Similar Recipes