आलू वांगे भाजी (नागपूरी) (aloo vange bhaji recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

आलू वांगे भाजी ही नागपूर विदर्भाची खासियत आहे.मी बरीच वर्षे तिकडे राहिल्याने माझ्या पदार्थांवर ती छाप आहे.आमच्या घरी सर्वांना तशाच प्रकारच्या भाज्या आवडतात.आलू वांगे भाजी खुप तेल आणि तिखट टाकून बनविली जाते परंतु मी कमी तेला-तिखटाचा वापर केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-12 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 4मध्यम हिरवी वांगी
  2. 1मध्यम बटाटा
  3. 1मध्यम कांदा
  4. 7-8पाकळ्या लसूण
  5. 1/2 इंचआले तुकडा
  6. 1 टेबलस्पूनखोबरे किसून
  7. फोडणीचे साहित्य
  8. तेल गरजेनुसार
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. कोथिंबीर बारीक चिरून

कुकिंग सूचना

10-12 मिनिटे
  1. 1

    आलू वांग्याचे मोठे तुकडे करुन पाण्यात ठेवा.

  2. 2

    मिक्सरमध्ये कांदा, लसूण, आले, खोबरे,थोडी कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या.कढ ईत बर्यापैकी तेल तापवून त्यात वाटलेला मसाला घालून परतवा.हळद, तिखट हवे तसे घाला.मीठ घाला.तेल सुटेपर्यंत मसाला परतवा.गरम मसाला घालावा.

  3. 3

    गरजेनुसार पाणी घाला.

  4. 4

    आलू वांगे फोडी घालून झाकण ठेवून 10 मिनिटे शिजू द्या.भाजी शिजली की, कोथिंबीर घालून गरम गरम भाजी पोळी भाकरी सोबत सर्व्ह करा.आपल्याला तिखट हवी तर झणझणीत करा.तेला तिखटाचा तवंग भाजीवर हवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes