अंडा मसाला(anda masala)

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#rr अंडा मसाला
अंड्याच काय करायचं हा प्रश्न पडतो मग हे झटपट असा अंडा मसाला करून बघा.

अंडा मसाला(anda masala)

#rr अंडा मसाला
अंड्याच काय करायचं हा प्रश्न पडतो मग हे झटपट असा अंडा मसाला करून बघा.

Edit recipe
See report
Share
Share

Ingredients

१ तास
  1. ३ उकडलेली अंडी
  2. मीठ चवीनुसार
  3. चिमुटभर हळद पावडर
  4. १/२ टीस्पून लाल मिरची पावडर
  5. ४ टेबलस्पून तेल
  6. २ लवंग
  7. १ छोटा तुकडा दालचीन
  8. १ टीस्पून जिरं
  9. २ हिरव्या मिरच्या
  10. २ मध्यम आकाराचे कांदे
  11. १ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट
  12. १/२ टीस्पून हळद
  13. १ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  14. १/२ टीस्पून धणे पावडर
  15. १/२ टीस्पून जीरे पावडर
  16. २ टोमॅटोची प्युरी
  17. १टीस्पून कसुरी मेथी
  18. १/२ टेबलस्पून चिकन मसाला
  19. आवश्यकतेनुसार कोंथिबीर
  20. आवश्यकतेनुसार पाणी

Cooking Instructions

१ तास
  1. 1

    सर्व प्रथम अंडी उकडून घ्या.मग उकडून झाल्यावर त्याला काटेरी चमच्याने होल पाडून घ्या.मग त्याला हळद, लाल मिरची पावडर,मीठ हे सगळं अंड्याला लावून घ्या.मग एका कढई मध्ये तेल तापवून त्यात हि अंडी परतून घ्या.

  2. 2

    मग त्याच कढई मध्ये तेल घेवून त्यात जीर, दालचिनी, लवंग हिरवी मिरची टाकून परतून घ्या.मग त्यात बारीक चिरलेला कांदा टाका चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या.मग त्यात आलं लसूण ची पेस्ट टाका.मग चांगला लालसर रंग येईपर्यंत परता.

  3. 3

    मग चांगलं परतून झाल्यावर त्यात हळद,लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर टाकून चांगले मसाले परतून घ्या.मग त्यात टोमॅटोची प्युरी टाका. चांगलं परतून घ्या मग थोडं पाणी टाका. मग त्यात मीठ, कसुरी मेथी, चिकन मसाला टाका चांगलं परतून घ्या मग मग त्यात अंडी टाका आणि ५मिनिट झाकण ठेवा. मग गॅस बंद करा. वरून मस्त कोथींबीर टाका मग तयार अंडा मसाला

Edit recipe
See report
Share
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
on
Kalamboli

Comments

Similar Recipes