अळूवडी (aloo wadi recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#अळूवडी #
अळुवडीचं नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटत. महाराष्ट्रीयन थाळी अळूवडी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी खाद्य संस्कृतीत अळुवडीला विशेष महत्व आहे. ही खमंग व रुचकर जिभेचेच चोचले पुरवतच नाही तर ती तितकीच तब्बेतीची निगा राखते तिच्या सेवनाने किडनी संबंधीचे आजार होत नाहीत.
खमंग आणि रुचकर व तितकीच हेल्दी आणि गुणकारी अळूवडी कशी बनवायची ते पाहूया.

अळूवडी (aloo wadi recipe in marathi)

#अळूवडी #
अळुवडीचं नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटत. महाराष्ट्रीयन थाळी अळूवडी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी खाद्य संस्कृतीत अळुवडीला विशेष महत्व आहे. ही खमंग व रुचकर जिभेचेच चोचले पुरवतच नाही तर ती तितकीच तब्बेतीची निगा राखते तिच्या सेवनाने किडनी संबंधीचे आजार होत नाहीत.
खमंग आणि रुचकर व तितकीच हेल्दी आणि गुणकारी अळूवडी कशी बनवायची ते पाहूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
4 व्यक्तींसाठी
  1. 8अळूची काळ्या देठाची पाने
  2. 1 कपबेसन
  3. 2 टेबलस्पूनचिंच
  4. 2 टेबलस्पूनगुळ
  5. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टेबलस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनमीठ
  8. 1/2 टेबलस्पूनहिंग
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. अळूवडी तळण्यासाठी तेल
  11. आवडत असलेले मसाले घ्यावेत

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    अळूची पाने स्वच्छ धुवून पानाच्या शिरा काढून त्या पानावर लाटणे फिरवून पानाच्या शिरा दाबून घ्याव्यात

  2. 2

    चिंच आणि गुळ वेग वेगळे भिजवून ठेवावेत बेसन मध्ये मसाले मीठ घालावेत

  3. 3

    गॅसवर मध्यम आचेवर फोडणी पात्रात तेल तापवून त्यात हिंग घालून गरम तेल बेसनवर ओतावे

  4. 4

    तेल बेसनला चोळून घ्यावे. त्यात चिंचेचे व गुळाचे पाणी घालून मिश्रण तयार करावे

  5. 5

    तयार केलेले मिश्रण अळूचे एक पान घेऊन त्यावर पसरून लावावे. दुसरं पान फोटोत दाखवल्या प्रमाणे उलटे ठेऊन त्यावर मिश्रण पसरवून घ्यावे परत तिसरं पान पहिल्या पानासारखं ठेवून त्यावर मिश्रण पसरवावे.परत दुसऱ्या पाना प्रमाणे चौथ पान ठेवावे.नंतर दोन्ही बाजूनी दुमडून त्यावर मिश्रण लावून त्याची घट्ट गुंडाळी करावी.

  6. 6
  7. 7
  8. 8

    एका मोठ्या भांड्यात स्टॅन्ड ठेवून पाणी गरम करून त्यात अळूची गुंडाळी पंधरा मिनिटे उकडून घ्यावी.

  9. 9
  10. 10

    गुंडाळी थंड झाल्यावर अर्धा इंचाच्या वड्या कापून घ्याव्यात.

  11. 11

    गॅसवर मध्यम आचेवर तेल तापवून घ्यावे त्यात अळूवड्या तळून घ्याव्यात.

  12. 12
  13. 13

    अळूवडी तयार गोड चटणी किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावी.

  14. 14

    अळूवडी शॉलो फ्राय करून किंवा त्यावर राई तीळाची फोडणी देऊन सुद्धा छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes