औषधी तांदुळजा (tandulja recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#msr पावसाळा आला कीं , रानभाज्यांची रेलचेल असते. या रानभाज्या अतिशय हितकारक असतात .तांदूळजा ही भाजी तर पोटांच्या अनेक विकारांवर गुणकारी ठरते .अशा गुणकारी भाजीत , कॅल्शियम युक्त कांदा, प्रोटीन युक्त शेंगदाणा ,बहुगुणी लसुण घालून, औषधांच्या बरोबर पौष्टिकता पण वाढवली आहे .झटपट होणारी ही भाजी अवश्य करा आणि गरम गरम भाकरी किंवा पोळी बरोबर खा व स्वस्थ व्हा .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते 12 मिनिटे
2 सर्व्हिंगस
  1. 1मोठी जोडी तांदूळजा
  2. 1कांदा मध्यम आकाराचा
  3. 3-4लसूण पाकळ्या
  4. 2 टीस्पूनशेंगदाणे कूट
  5. 2 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनधणे जीरे पूड
  7. 1/4 टी स्पूनहळद
  8. चवीपुरते मीठ
  9. 2 टीस्पूनतेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

10 ते 12 मिनिटे
  1. 1

    भाजी स्वच्छ धुऊन निवडा.कांदा चिरून,लसूण जाडसर ठेचुन घ्या. भाजी मोठीमोठी चिरा.
    गॅसवर कढईत तेलाची फोडणी ठेवा. तेल तापल्यावर, त्यांत मोहरी,जीरे टाका. ते तडतडल्यावर, त्यांत कांदा व लसुण टाका. फोडणीत चिमूटभर हळद व लाल तिखट टाकून कांदा तांबस होऊ द्या.

  2. 2

    कांदा तांबूस झाल्यानंतर, त्यांत तांदूळज्याची भाजी टाका. वरून लाल तिखट,हळद, धने जीरे पूड, मीठ टाकून भाजी छान परता व 2-4 मिनिटांसाठी झाकून वाफ येऊ द्या. झाकण उघडून त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी मिक्स करा.

  3. 3

    हिरवीगार, लुसलुशीत व मस्तपैकी तांदुळजा भाजी तयार झाली. गरम गरम भाकरी किंवा पोळी बरोबर गरम भाजी सर्व्ह करा व त्याची मज्जा लुटा व स्वस्थ रहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes