लाल माठाची मोकळी भाजी (lal mathachi mokli bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#msr #मला बरेच दिवसांनी ही भाजी मिळाली. त्यामुळे मी आज ही मोकळी भाजी केली आहे. छान लागते चवीला,... शिवाय कमी साहित्यात, झटपट होते..

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10-15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी लाल मठाची भाजी
  2. 2मोठे कांदे उभे चिरून
  3. 4लाल मिरच्या
  4. 5-6लसूण पाकळ्या बारीक चिरून
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनधणे पूड
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

10-15 मिनिट
  1. 1

    भाजीची पाने तोडून घ्यावीत. आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावी. आणि चाळणी तून निथळून घ्यावी. चिरून घ्यावी. कांदा, मिरची, लसूण चिरून घ्यावे.

  2. 2

    आता एका कढईत तेल टाकून ते गरम करावे. जीरे, मोहरी, टाकून ते तडतडल्यावर त्यात कांदा, मिरची, आणि लसूण टाकावे. कांदा सोनेरी होईपर्यंत परतावा.

  3. 3

    त्यानंतर त्यात हळद, धणे पूड आणि मीठ टाकून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात चिरलेली भाजी टाकावी. आणि मिक्स करून घ्यावी. झाकण ठेवून 3-4 मिनिट शिजवावे.

  4. 4

    आता झाकण काढून भाजी शिजल्याची खात्री करावी. झटपट लाल माठाची मोकळी भाजी तयार आहे जेवणासाठी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Khup chhan👌👌
Hi dear 🙋
Your all recipes are superb.You can check my profile and do like and comment if u wish😊😊

यांनी लिहिलेले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes