चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 500 ग्रामचिकन
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1 टेबलस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 3 टीस्पूनआगरी कोळी मसाला किंवा घरगुती कोणताही मसाला
  7. 1 टीस्पूनबेडगी मिरची पावडर
  8. 1 टीस्पूनगरम मसाला/ चिकन मसाला
  9. मीठ चवी नुसार
  10. 5-6 टेबलस्पूनतेल
  11. पाणी आवशकते नुसार
  12. भाजलेले कांदा खोबऱ्याचे वाटणाचे साहित्य......
  13. 1/2 वाटीकिसलेले खोबरे
  14. 1कांदा उभा चिरलेला
  15. 5-6लसूण पाकळ्या
  16. 1 इंचअद्रक
  17. 6-7काजू
  18. 2-3हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी तव्यामध्ये कांदा आणि खोबरं भाजून घ्यावे, मग मिक्सर च्या भांड्यात काढून त्यात लसूण, अद्रक, काजू, मिरच्या घालून थोडे थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    आता भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी होई पर्यंत परतून घ्यावा. मग त्यात चिकन, अद्रक लसूण पेस्ट, हळद, हिंग, मसाले, मीठ घालून छान परतून घ्यावे परतून झाल्यावर झाकण ठेवून मंद अचेवर तेल सुटू द्यावे, मग झाकण काढून त्यामध्ये गरम पाणी घालावे आणि झाकण ठेवून चिकन शिजू द्यावे, चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये आवशकते प्रमाणे वाटणं घालून 3-4 मिनिटे ठेवून मग गॅस बंद करावे.

  3. 3

    गरमा गरम ग्रेव्ही चिकन तयार हे चिकन भाकरी, भाता बरोबर सर्व्ह करू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes