गुळशेल (gulshel recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#gpr
#गुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपी
#गुळशेल

गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

गुरुपौर्णिमा हा आषाढातील पहिला सण त्यानिमित्त घरोघरी कुलदैवतेला आणि गुरु ला गोडाचा नैवेद्य दाखविला जातो.... त्या साठी खास पारंपारिक गुळशेल रेसिपी....

गुळशेल (gulshel recipe in marathi)

#gpr
#गुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपी
#गुळशेल

गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

गुरुपौर्णिमा हा आषाढातील पहिला सण त्यानिमित्त घरोघरी कुलदैवतेला आणि गुरु ला गोडाचा नैवेद्य दाखविला जातो.... त्या साठी खास पारंपारिक गुळशेल रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मी.
3 सर्व्हिंग
  1. 1 लिटरफुल क्रिम दूध
  2. 1 पावलाल कोहळ
  3. 2-1/2 कपसाखर
  4. 2 टेबलस्पूनकणीक
  5. 2 टेबलस्पूनतूप
  6. 1 टेबलस्पूनवेलची पूड
  7. 1 टीस्पूनजायफळ पावडर
  8. 7केशर काड्या
  9. 10चारोळ्या
  10. 2 टेबलस्पूनबारीक कट केलेले बादाम काजू

कुकिंग सूचना

40 मी.
  1. 1

    सर्वप्रथम दुध पातेल्यात गॅस वर गरम करून आटवून घ्या.

  2. 2

    कोहळ किसणीने किसून घ्या. एका कढईमध्ये तूप घालून कणीक भाजून घ्या.त्या नंतर पुन्हा कढईमध्ये तूप घालून कोहळ्याचा कीस परतून घ्या.

  3. 3

    कोहळ्याचा किस छान परतून झाला की त्यामध्ये साखर घाला आणि मिक्स करून घ्या. मग त्यात तुपावर भाजलेली कणीक घालून ढवळून घ्या. एका वाटीत थंड दूध घालून केसर भिजत ठेवा.

  4. 4

    सगळं मिश्रण एकजीव करून घ्या.मग त्यात केशर चे दूध आणि आटवलेले दूध घालून ढवळत राहा.

  5. 5

    या मिश्रणामध्ये जायफळ पावडर, वेलची पूड, चारोळी, बदाम काजूचे काप घालून मिक्स करा आणि छान उकळी येवू दया.

  6. 6

    तयार गुळशेल वरून केशराच्या काड्या बदाम, काजू चे काप घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या (7)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
मस्त, माझ्या पेक्षा वेगळी पद्धत.. नक्की ट्राय करेन..

Similar Recipes