फोडणीचे कांदेपोहे (phodniche kandepohe recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

फोडणीचे कांदेपोहे (phodniche kandepohe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
३ जणांसाठी
  1. 2 कपजाडे पोहे
  2. 1मोठा कांदा बारीक चिरून
  3. 3-4हिरवी मिरची बारीक चिरून
  4. 1 टेबलस्पूनदाणे
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 1 इंचआलं बारीक चिरून
  7. 1/2हिंग
  8. 1 टेबलस्पूनसाखर
  9. 5-6कढीपत्त्याची पाने
  10. लिंबाचा रस
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  13. ओलं खोबरं किंवा बारीक शेवआवडीप्रमाणे
  14. तेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम पोहे करण्यापूर्वी पाच मिनिटे आधी चाळणीत भिजवून निथळत ठेवावेत.तेलात दाणे तळून घ्यावेत.

  2. 2

    तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्त्याची पाने टाकून फोडणी करावी. तळलेले दाणे, कांदा,आलं, मिरची व हळद घालून परतावे

  3. 3

    नंतर पोह्यांवर मीठ,थोडी साखर पसरून ते फोडणीत टाकावे.चांगले हलवावेत.

  4. 4

    गरमागरम पोहे खायला देताना कोथिंबीर, ओले खोबरे किंवा शेव टाकावी

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या (2)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
nice .tumhi green colour combination use karta recipe pics madhe ani sarw recipe madhe green color ha astoch which looks beautiful n calm ..just like satwik recipe astat .

Similar Recipes