रविवार स्पेशल नाष्टा इडली,चटणी सांबार (idli sambhar chutney recipe in marathi)

Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd

#wdr
# week end recipe

रविवार स्पेशल नाष्टा इडली,चटणी सांबार (idli sambhar chutney recipe in marathi)

#wdr
# week end recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
4 जणं
  1. 3 वाट्याजाड तांदुळ
  2. 1 वाटीउडीद डाळ
  3. 1 टीस्पूनमेथीदाणा
  4. 1 वाटीतुरदाळ
  5. 1 टीस्पूनहिंग
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 10हीरव्या मिरच्या
  8. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  9. टेबलस्पूनसांभार मसाला
  10. थोडा कढीपत्ता
  11. बारीक चिरून कोथिंबीर
  12. 1कांदा
  13. 1 वाटीबटाटा,फ्लाॅवर,शेवगा शेंग,टोमॅटो आणि आवडीप्रमाणे चिरलेल्या भाज्या
  14. 1 वाटीदही
  15. 1 टेबलस्पूनदाळवा
  16. 1 टीस्पूनजीरे
  17. 1 टेबलस्पूनधणेजीरे पुड
  18. 1 टेबलस्पूनखोबरा कीस
  19. मीठ चवीप्रमाणे
  20. साखर चवीप्रमाणे
  21. थोडे पुदीना पाने

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    डाळ,तांदूळ + मेथीदाणे वेगवेगळे भिजत घालायचे साधारण 5 तास आधी..छान भिजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे.1 वाटी जाड पोहे पाण्यात भिजवून ते पण मिक्सीत बारीक करून सर्व एकत्र करून रात्रभर झाकून गरम ठीकाणी आंबवायला ठेवून द्यावे.

  2. 2

    मिश्रण आंबलेले असेल, त्यात मीठ घालून हळूवार फीरवावे.इडलीपात्रामध्ये वाफवून इडल्या बनवून घ्यावे.आता तुरडाळ शिजवून वरण बनवून घ्यावे..कढईत तेलाची फोडणी करून जीरे घालून हींग,हळद,लाल तिखट,धणेजीरे पुड घालून चिरलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या.

  3. 3

    थोडे पाणी घालून भाज्यांना मस्त वाफवून घ्यावे आणि त्यात सांभार मसाला घालून पातळ केलेले वरण घालावे.मीठ घालावे.आवडत असेल तर थोडा गुळ व आमचूर पावडर घालावी.कोथिंबीर घालून उकळून घ्यावे.चटणीसाठी मिक्सीमध्ये दही,साखर,मीठ,हीरवी मिरची,दाळवा,खोबरा कीस,कोथिंबीर, पुदीना पाने घालून बारीक फीरवून घ्यावे.पाणी घालून पाहीजे तेवढे पातळ करून थोड्या तेलाची मोहरी व कढीपत्याची खमंग फोडणी त्यावर टाकावी.

  4. 4

    आपली वीकऐंड नाष्टा रेसीपी इडली सांभार चटणी सर्व्ह करायला तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sandhya Deshmukh
Sandhya Deshmukh @4567vijayd
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes