ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)

Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08

पोटभरीचे व पौष्टिक खाणे महत्त्वाचे. म्हणून थोडा वेगळा उत्तपम. हयात ओट्स वापरले आहेत. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओट्स हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे ओट्स खाण्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला फायदा होतो.
#cpm7

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मिनिटे
  1. 1-1/2 वाटी ओट्स
  2. 1 वाटीरवा
  3. 1/2 वाटीदही
  4. 1-2 चमचेमिरची
  5. 1-2 चमचेआले पेस्ट
  6. थोडी चिरलेली कोथिंबीर व पुदिना
  7. 1बारीक चिरलेला कांदा
  8. 1किसलेले गाजर
  9. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

३०-४० मिनिटे
  1. 1

    ओट्सची मिक्सरमध्ये जाडसर पावडर करावी. त्यात रवा, दही व मीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करावे. हे मिश्रण साधारणपणे १/२ तास ठेवावे.

  2. 2

    मग त्यात कांदा, गाजर, मिरची - आले पेस्ट, कोथिंबीर, पुदिना घालून मिक्स करावे. हवे असल्यास थोडे पाणी घालावे.

  3. 3

    गरम तव्यावर पीठ घालून उत्तपम रेडी करावा. चटणीबरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08
रोजी

Similar Recipes