"रवा उत्तपम" (rava uttapam recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#ब्रेकफास्ट
#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर
#मंगळवार_उत्तपम

" रवा उत्तपम"
रवा उत्तपम ला वेगवेगळ्या पद्धतीने सजवुन नातवंडांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे..

"रवा उत्तपम" (rava uttapam recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर
#मंगळवार_उत्तपम

" रवा उत्तपम"
रवा उत्तपम ला वेगवेगळ्या पद्धतीने सजवुन नातवंडांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार, पाच
  1. 1 कपरवा
  2. 1 कपदही
  3. 1 टीस्पूनमिरची आले पेस्ट
  4. 1 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  5. 1/4 कपबारीक कापून सिमला मिरची
  6. 1/4 कपकिसलेले गाजर
  7. 2टाॅमेटो बारीक कापून
  8. 2कांदे बारीक कापून
  9. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. 2 -3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    एका वाटी मध्ये रवा घेऊन त्यात दही, सगळ्या भाज्या, मीठ,काळीमिरी पावडर, बेकिंग सोडा घालून घ्यावे

  2. 2

    सगळे जिन्नस एकत्र मिसळून मिक्स करून घ्यावे व दहा मिनिटे झाकून ठेवावे

  3. 3

    गॅस वर तवा तापत ठेवावे आणि गॅस मिडीयम पेक्षा कमी असावा.. तव्यावर तेल घालून चमच्याने मिश्रण घालावे व त्याला गोल आकार देऊन त्यावर थोडे किसलेले गाजर, कांदा, टाॅमेटो घालून हलक्या हाताने दाबून घ्यावे

  4. 4

    उभ्या आकाराची कापलेल्या सिमला मिरची ने तोंडाचा आकार द्यावा भुवया टाॅमेटोच्या स्लाइस ने कराव्यात आणि दोन सिमला मिरची च्या बारीक तुकडे डोळ्यांच्या जागी ठेवावे..

  5. 5

    अशाप्रकारे मांडणी करून वरुन तेल सोडावे व दोन मिनिटांनी उलटुन दुसरी बाजू ही चांगली खरपुस भाजुन घ्यावी...

  6. 6

    अशाप्रकारे तयार झालेले उत्तपम साॅस सोबत सर्व्ह करावे..

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes