उप्पमा (upma recipe in marathi)

Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
Navi Mumbai

#bfr उप्पमा ही झटपट तयार होणारी डिश आहे. सकाळच्या वेळी गृहीणीना टिफीन, ब्रेकफास्ट, लंच अशी तारे वरची करत चालू असते . अश्या वेळी उप्पमा हा छान पर्याय असू शकतो

उप्पमा (upma recipe in marathi)

#bfr उप्पमा ही झटपट तयार होणारी डिश आहे. सकाळच्या वेळी गृहीणीना टिफीन, ब्रेकफास्ट, लंच अशी तारे वरची करत चालू असते . अश्या वेळी उप्पमा हा छान पर्याय असू शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीभाजलेला रवा
  2. 1मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
  3. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 10लसूण पाकळ्या
  5. 1 -1/2 इंच आले बरिक किसलेले
  6. 3 चमचाउडीद डाळ
  7. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
  8. 5-6 कडीपत्याची पाने
  9. 1/2मोहरी
  10. 1/2 चमचाहळद
  11. 1/4चमचा हींग
  12. बारीक शेव, कोथींबीर, लिंबू
  13. 1 चमचामीठ,
  14. 4 चमचेतेल
  15. 1-1/2 वाटी पाणी /ताक

कुकिंग सूचना

20 मिनीटे
  1. 1

    प्रथम कढई गरम करून त्यात तेल घालावे. मोहरी घालावी.ती चांगली फुटू लागली की कडीपत्ता घालावा.

  2. 2

    आता त्याच्यात मिरची घालुन परतावे. कांदा घालून चांगले परतून घ्यावे मध्यम आचेवर कांदा भाजुन द्यावं. कांदा गुलाबी रंगाचा झाला की टोमॅटो घालावे आणि परतून घ्यावे. चीमट भर मीठ घालून झाकण लावून ठेवावे

  3. 3

    2 मिनिटाने झाकण काढून हलवावे टॉमोटो तेलात विरघळून गेला की उडीद डाळ,किसलेले आले आणि लसुण घालावं

  4. 4

    त्यात हळद, हींग, मीठ घालून परतावे. पाणी / ताक घालून झाकण ठेवावं उकळी आल्यावर त्यात रवा घालून चांगले ढवळावे. त्याच्या वर झाकण ठेऊन मंद आचेवर शिजून दयावे

  5. 5

    5 मिनिटांनी झाकण काढून कोथींबीर घालून परतावे उप्पमा सर्व्ह करताना वरून शेव आणि लिंबू घालून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Asha Thorat
Asha Thorat @AshaThorat
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes