मीनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

# कुकस्नॅप
आज मी कुकस्नॅप साठी jaishri hate यांची मीनी उत्तप्पा ही रेसिपी केली आहे. झटपट होणारी व चवीला छान अशी ही रेसिपी आहे.

मीनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)

# कुकस्नॅप
आज मी कुकस्नॅप साठी jaishri hate यांची मीनी उत्तप्पा ही रेसिपी केली आहे. झटपट होणारी व चवीला छान अशी ही रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
3 माणसांसाठी
  1. 1 कपतांदूळ
  2. 1/4 कपउडदाची डाळ
  3. 1बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची
  4. 1बारीक चिरलेला कांदा
  5. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  6. 1बारीक चिरलेली हिरवी मिरची
  7. 1/4 टेबलस्पूनकिसलेले आले
  8. 1 टेबलस्पूनमीठ
  9. 4 टेबलस्पूनतेल
  10. ओल्या नारळाची चटणी

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून 6 तास भिजत घालावेत. पाणी काढून मिक्सरमधून वाटून घ्यावे. रात्रभर तसेच ठेवावे.

  2. 2

    सकाळी पीठ छान फुलून येते. आता हे पीठ छान फेटून घ्यावे. फेटलेल्या पीठात हिरवी सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालावा.

  3. 3

    त्यात आले, मीरची व मीठ घालून मीक्स करून घ्यावे.

  4. 4

    गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवावा. त्यावर थोडे तेल घालून लहान-लहान गोल उत्तप्पे घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.

  5. 5

    झाकण काढून उलटून घ्यावे. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.

  6. 6

    एका प्लेट मध्ये काढून चटणी बरोबर खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
रोजी

Similar Recipes