सात्विक तोंडली भाजी (tondali bhaji recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

सात्विक भोजन” म्हणजे लसूण कांदा वर्जित भोजन होय
सात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जात असतं.
आपण नवेद्या ला कांदा लसूण न घालता भाजी करतो पण त्याची चव खूप चांगली असते
कधीकधी फार मसाले न घालता तिखट मीठ हळद घालून भाजी केली तरी छान लागते
मी तोंडलीची भाजी कांदा लसूण न घालता साध्या पद्धतीने केली आहे तर बघूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोतोंडली
  2. 7-8 कढीपत्त्याची पाने
  3. थोडी कोथिंबीर
  4. 1 टेबलस्पूनजीरे
  5. 1 टेबलस्पून मोहरी
  6. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टीस्पूनधने पावडर
  10. चवीपुरते मीठ
  11. फोडणीसाठी तेल
  12. थोडा मॅगी मॅजिक मसाला

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम तोंडली धुऊन स्वच्छ पुसून उभे कापून घ्यावे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे कोथिंबीर चिरून घ्यावी

  2. 2

    नंतर एक भांडे घेऊन ते गॅसवर ठेवावे त्यात तेल घालावे तेल तापले की जीरे मोहरी घालून घ्यावे मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता कोथिंबीर घालून घ्यावी थोडी कोथिंबीर वरती सर्व्ह करण्यासाठी ठेवावी तेलात हळद धने पावडर तिखट घालून घ्यावे नंतर त्यात चिरलेली तोंडली घालून घ्यावी

  3. 3

    तोंडली घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यावे आता त्यात गरम मसाला मीठ घालून घ्यावे सर्व एकत्र कालवून घ्यावे थोडा पाण्याचा हबका देऊन झाकण लावून पाच मिनिट ठेवावे

  4. 4

    पाच मिनिटांनी झाकण काढून घ्यावे त्यात मॅगी मॅजिक मसाला घालावा सर्व भाजी एकत्र मिक्स करून घ्यावी छान गरमागरम तोंडलीची भाजी तयार पोळी सोबत सर्व्ह करावे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes