कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#ट्रेडिंग रेसिपीज

कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)

#ट्रेडिंग रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचणाडाळ
  2. 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  3. 1 टेबलस्पूनगुळ
  4. 1/4 वाटीसुखं खोबर
  5. 2 टीस्पूनतीळ
  6. 6लसुण पाकळ्या
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 2 टीस्पूनतिखट
  10. 1 टीस्पूनगोडा मसाला
  11. चवीनुसारमीठ
  12. कोथिंबीर
  13. तेल
  14. 1 टेबलस्पूनभाजलेली चणाडाळ
  15. आलं
  16. कढीपत्ता

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम चणा डाळ स्वच्छ धुऊन कुकरला चार शिट्ट्या काढून घ्याव्यात नंतर एका कढईत तेल घेऊन त्यात सुकं खोबरं, तीळ, लसुन, भाजलेली चणा डाळ, आलं घालून चांगलं परतून घेणे व गॅस बंद करणे

  2. 2

    भाजलेले मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर च्या भांड्यात घेऊन त्यात कोथिंबीर व जीरे घालून मिक्सरला जाडसर वाटून घेणे नंतर शिजलेली डाळ प्रवीण च्या साह्याने चांगली फेटून घेणे व त्यात चार ग्लास पाणी घालावे

  3. 3

    नंतर एका कढईत तेल घेणे त्यात हिंग, मोहरी व कडीपत्त्याची फोडणी करून घेणे नंतर त्यात आपण वाटलेले वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घेणे ते सुटल्यानंतर त्यात हळद, तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, मीठ घालून मिश्रण चांगले परतून घेणे मसाला चांगला परतल्यावर त्यात आपण शिजवलेली डाळ घालून चांगले मिक्स करून घेणे.

  4. 4

    आमटीला छान उकळी आली की त्यात चिंचेचा कोळ व गूळ घालून घेणे व पुन्हा मध्यम आचेवर दहा मिनिटे छान आमटी उकळू देणे नंतर वरुन कोथिंबीर घालने व सर्व्ह करणे

  5. 5

    गरमागरम आमटी भाताबरोबर सर्व्ह करणे
    (ही आमटी जेव्हा आपण पुरणपोळ्या करतो तेव्हा आपण ची डाळ शिजवतो त्या डाळीचा जो कट(पाणी) निघतो त्याची आपण आमटी बनवतो स्पेशली पुरणपोळ्या ज्या दिवशी त्या दिवशी कटाची आमटी ही असतेच असते)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447
@Nandini_homechef तुमची कटाची आमटी ही रेसीपी कुकस्नॅप केली व खुप छान झाली सुंदर Thanks

Similar Recipes