दानेेदार बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#rbr
श्रावण महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात संपूर्ण भारतात हा दिवस राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणून साजरा करतात. रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते हा राखीचा धागा म्हणजे फक्त धागा नाही तर हे प्रेमळ बंधन आहे. या राखीच्या बंधनामुळे भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी कायम या प्रेम रुपी बंधात बांधला जातो. तर आजच्या या दिवशी मी माझ्या भावाला आवडणारी बेसन बर्फी केली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
अधिक
  1. 3 कपसाखर
  2. 2 कपतूप
  3. 4 कपजाडसर बेसन पीठ
  4. 4 चमचेदूध

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    अगोदर सर्व बेसन पीठ चाळणीने चाळून घेणे. आता 4 चमचे दूध आणि 4 चमचे तूप मिक्स करून घेणे.आता हे मिश्रण बेसन मध्ये टाकून बेसन ला सगळीकडे नीट चोळून घेणे.बेसनाचे टेक्चर रवाळ झाले पाहिजे.

  2. 2

    आता हे पीठ पुन्हा 1 दा चाळून घेणे.आता कढई मध्ये अर्धे तूप टाकून त्यात चाळलेले बेसन घालून मंद गॅस वर बेसन भाजणे.बेसन भाजत असतानाच त्यातील गाठी चमचाने मोडून घेणे.

  3. 3

    आता बाकीचे राहिलेले तूप घालून घेणे. साधारण 35 ते 40 मिनिटांनी पीठ तूप सोडू लागेल आणि त्याचा कलर सुद्धा हलका गुलाबीसर होईल.तेव्हा आपले पीठ भाजून झाले असे समजावे.

  4. 4

    पीठ भाजत आले असतानाच दुसऱ्या गॅसवर पातेल्यात पाक करण्यासाठी तीन कप साखर दिड कप पाणी टाकून एक तारी पाक बनवून घेणे. आता हा बनलेला पाक वरील बेसनात घालून घेणे व सर्व मिश्रण एकजीव करणे

  5. 5

    आता एखाद्या ट्रे किंवा ताटाला तूपाने ग्रीस करून घेणे.वरील मिश्रण ताटामध्ये ओतून सेट होण्यास ठेवणे. सुरी ला तुपाने ग्रीस करून मिश्रण एकसारखे करणे. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कट करून डेकोरेट करणे. कोमट झाले की सुरीने दाब देऊन स्लाईस बनवून घेणे

  6. 6

    बर्फी पूर्ण थंड झाली की मग अलगद वड्या सोडून घेणे

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes