मुगाची कचोरी (moongachi kachori recipe in marathi)
शेगाव कचोरी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगडाळ २तास भिजवून जाडसर वाटून घ्यावी. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
- 2
२पळ्या तेल गरम करून त्यावर हिंग कोथिंबीर पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणेजिरे पावडर, पाव चमचा ओवा टाकुन त्यावर वाटलेली मुगडाळ टाकावी चवीपुरते मीठ घालावे व कोरडे होईस्तोवर परतवून घ्यावे हे मिश्रण थंड करावे
- 3
मैदा, कणिक, मीठ व एक पळी तेल एकत्र करून घट्ट भिजवून घ्यावे ५ मिनिटे झाकून ठेऊन मग पारी लाटून घेऊन त्यात वरील सारण भरून घट्ट बंद करून परत जाडसर लाटावे गरम तेलात मध्यम आचेवर या कचोऱ्या तळाव्यात चिंचेच्या चटणी अथवा टम्याटो सॉस बरोबर खाव्यात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेगाव कचोरी (Shegaon kachori recipe in marathi)
#फ्राईडशेगाव कचोरी हा शेगाव चा प्रतिष्ठित ब्रांड आहे.शेगावला दरवर्षी लाखो भाविक गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला येतात आणि दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक ही कचोरी खाणयाचा मोह टाळू शकणार नाही.तर आज आपण तीच शेगाव स्पेशल कचोरी बघणार आहोत.Jyoti Ghuge
-
मुगाची कचोरी (moongachi kachori recipe in marathi)
#KS8औरंगाबादला बाजारात खरेदीला गेल्यावर हमखास आमचा मोर्चा गायत्री चाट भंडारकडे वळतो. इथली खासीयत म्हणजे हिरव्या मुगाची गरमागरम कचोरी वरून हिरवी चटणी व चींचेची चटणी. तिखट;अंबट;गोड चवीचा धमाका 😋😋 Anjali Muley Panse -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
मस्त ,झटपट होणारी,सगळ्यांच्या आवडीची शेगाव कचोरी मी केली आहे.#EB2 #W2 Sushama Potdar -
दिल कचोरी (dil kachori recipe in marathi)
#Heart#valentine's day special#दिल कचोरी रेसिपी Rupali Atre - deshpande -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12शेगाव कचोरी.कचोरी.. उत्तर भारतामध्ये याचं उगमस्थान..मुख्यतः राजस्थान हे कचोरीचे मूळ मानलं जातं...आणि मग तेथून कचोरीचं खूळ गुजरात,राजस्थान,दिल्ली,बंगाल,मध्यप्रदेश , महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलं. राजस्थान, मध्यप्रदेश येथे राहणार्या लोकांच्या रक्तातून WBC,RBC , हिमोग्लोबिन यांच्या बरोबर कचोरी पण वाहत असते..इतकं कचोरी प्रेम की सकाळी उठले की नाश्त्याला कचोर्याच हादडल्या पाहिजेत हे इथलं शास्त्र आहे. आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कचोरीचे नाव काढले तर एकच नाव ओठांवर येते...शेगाव कचोरी.. विदर्भाचा खजिन्यातला कोहिनूर हिरा आणि महाराष्ट्रातील पहिले ISO certificate मिळालेला पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात संत गजानन महाराज,आनंदसागर आणि कचोरी.. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर पाय आपोआपच कचोरी कडे वळतात...इतकी याची जबरदस्त क्रेझ आहे..या कचोरीची चव न चाखलेला माणूस विरळाच असेल.. तर अशा या बाहेरुन रुपवान असलेल्या आतून खमंग चवीचे गुपित राखणार्या महाराष्ट्राच्या शेगाव कचोरीचा माझ्या रेसिपीबुक मध्ये समावेश हवाच ..ही माझी खमंग खस्ता अशी इच्छा *कच* या मूळ शब्दापासून बनलेला कचोरी हा शब्द...याचा अर्थ बांधून ठेवणे...म्हणून मी तर असं म्हणेन की आपल्या खाद्यजीवनातील कचोरी नामक खमंग अध्यायाने आपल्या जिभेवर,मेंदूवर असं काही गारुड केलंय की आपण यात पू्र्णपणे गुरफटून गेलोत..याच्या वासात,चवीमध्ये.. कधीही न तुटणार्या रेशीमबंधात बांधले गेलोय.. Bhagyashree Lele -
मुगडाळ खास्ता कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
खुसखुशीत यम्मी खास्ता कचोरी. Rupali Atre - deshpande -
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marahti)
#रेसिपीबुक #week4. ll संत शिरोमणी गजानन महाराज की जय ll🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹गजानन माझा गुरु l गजानन कल्पतरू llसौख्याचा सागरू l गजानन llगजानन बंधू l गजानन छंदू llजीवनाचा आनंदु l गजानन llगजानन वित्त l गजानन माझे चित्त ll मज साक्षिभूत l गजानन llगजानन स्वप्नी l गजानन माझे ध्यानी llनरेंद्र म्हणे l मनी गजानन ll 🙏🌹 शेगाव हे गजानन महाराजांचं तीर्थस्थळ आहे. नागपूर पासून 298 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रात तरी शेगाव हे कुणालाच माहित नाही असं कोणीही नाही.😊 दरवर्षी वर्षातून एकदा आम्ही शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जात असतो. तिथलं ते भक्तिमय वातावरण, स्वच्छता, आनंदसागरच निसर्गरम्य वातावरण मनाला मोहून टाकत. मला खूप प्रसन्न वाटतं शेगावला. त्याचप्रमाणे शेगाव ची कचोरी आणि कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत. मला खूप आवडतात. तिथे गेल्यावर कचोरी खाल्ल्याशिवाय शेगाव ची यात्रा पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही😁. आता शेगाव ची कचोरी महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यात मिळते.पण तिथली कचोरी तिथेच खाण्यात जी मजा आहे, ती कुठे नाही ! नाही का ? त्याच तीर्थस्थळाच्या आणि पर्यटनस्थळाच्या आठवणीत मी आज शेगाव ची कचोरी केली. चला तर मग बघुयात कशी केली 😊 Shweta Amle -
फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणि कचोरी रेसिपीज#पोस्ट 2आम्ही एकदा शेगाव ला गेलो होतो त्यावेळी आम्ही सुप्रसिद्ध शेगाव कचोरी खाली. भरपूर बडीशेप व डाळ घालून केलेली कचोरी माझ्या मनात अगदी घर करून बसलीय. पण जेव्हा रेसिपी थीम समजली तेव्हा मी ठरवले की मी एक टिकाऊ फरसाण पासून वेगळीच कचोरी करून दाखवायची.मग लागले कामाला. आणि अतिशय टेस्टी व टिकाऊ कचोरी बनवली मी. Shubhangi Ghalsasi -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी कचोरी ही वेगवेगळ्या शहर व राज्याची वैशिष्ट्ये म्हणून त्या नावाने ओळखली जाते .प्रत्येक ठिकाणची कचोरी ही त्यात वापरलेला मसाला आणि आकार यामुळे ओळखली जाते.राजस्थानी कचोरी ही आकाराने मोठी व टम्म फुगलेली असते तरशेगाव ची कचोरी ही बेसन वापरून केली जाते व आकार खुप फुगलेला नसुन थोडी चपटी असते. Bharti R Sonawane -
शेगाव कचोरी
खूप खूप दिवसापासून शेगाव कचोरी खाण्याची इच्छा होते शेवटी मग काल फ्रीजमध्ये थोडे हिरवे वाटाणे सापडली मग काय रात्री भिजत घातले सकाळी उठून गरमागरम कचोऱ्या सगळ्यांना नाश्त्याला दिले. कचोरी आपण खूप प्रकारच्या खातो पण शेगावच्या कचोरी ची बातच न्यारी आहे नक्की करून बघा. कचोरी कचोरी शेगाव ची कचोरी. जय गजानन महाराज. Jyoti Gawankar -
सुप्रसिद्ध शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)
#KS3# सुप्रसिद्ध शेगाव काचोरी, आनंद सागर( बुलढाणा) Gital Haria -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#w2#कचोरीकचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज ६८ वर्षांचा झाला आहे. १९५० मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिर्थराम शर्मा यांनी कचोरी सेंटर सुरु केले. येथील रेल्वे स्टेशनवर चरितार्थासाठी सुरु केलेला हा व्यवसाय नंतर शेगावची ओळख बनला. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या या लहानग्या दुकानाचे रुपांतर मोठ्या दुकानात झाले. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक जण याठिकाणी आवर्जून कचोरी खातो. इतकेच नाही तर ही कचोरी आपल्या गावी पार्सल म्हणूनही नेली जातेआता ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणीही आता ही शेगाव कचोरी मिळते. सध्या शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असून करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता हा व्यवसाय पाहतात. आता ही कचोरी परदेशातही मिळत असून त्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान वापरुन ती फ्रोजन केली जाते.माझ्या फॅमिली सर्वात आवडीची शेगाव कचोरीया कचोरीची स्वतःची की छान टेस्ट आहे तिच्याबरोबर काहीच घेतले नाही अशीच खायला ही कचोरी छान लागते. मी थोडा रेसिपीत स्वतःचे काही बदल करून तयार केली आहे नक्कीच करून बघा शेगाव कचोरी Chetana Bhojak -
मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2#ईबुक रेसिपी चॅलेंजकचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरीमैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकताकचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुयाआणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते Sapna Sawaji -
कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
#कचोरी चाट + मिनी कचोरी#EB2#W2 Gital Haria -
दही कचोरी (Dahi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मैत्रिणींनो , आम्ही अमरावतीला रहात असताना, तेथील एका हॉटेल मध्ये दही कचोरी खूप मस्त मिळायची तशी दही कचोरी नंतर कुठेच खायला मिळाली नाही. कारण आता ते हॉटेल बंद झालेय...पण कचोरी म्हटले की तीच कचोरी आठवते! म्हणून कचोरी करायची म्हटल्यावर दही कचोरीच करावीशी वाटली.... Varsha Ingole Bele -
डायट कचोरी (diet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणी कचोरी रेसिपीजआजकाल डायट चा ओरडा चार ही दिशेने ऐकू येतो.त्यात कधी हे चालत नाही कधी ते चालत नाही मैदा आणी तळण जवळपास नाहीच पण जिभेचे लाड कसे पुरवणार. माझे डायट नाही पण तबियेत ती मुळे कचोरी मधे मैदा व तळण ला हा पर्याय शोधून काढला.. चल तर मग... डायट कचोरी शिकायला. Devyani Pande -
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje -
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपिबुक #week12 कचोरी आमच्या विदर्भात ही कचोरी एकदम प्रसिध्द आहे.त्यातही आमच्या घरी सर्वांना खूप आवडते ऑफिसमध्ये,शेजारी मैत्रिणीकडून खास आग्रह असतो , ऑर्डर्स पण असतात याचे.चवीला खूप उत्कृष्ठ .याला चटणी ची ही गरज नाही.हवितर मिरची तोंडी लावून खातात. Rohini Deshkar -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी लहानपणापासून नेहमीच शेगाव ला जात असते गजानन महाराजांचा दर्शनासाठी, तिथली कचोरी प्रसिद्ध आहे,मला खूप आवडते ह्या आठवड्यात थीम मुळे मी करून पाहीली,धन्यवाद cookpad Mansi Patwari -
कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजसगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला... Sampada Shrungarpure -
मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #week12 कचोरीकचोरी न आवडणारा खवैया शोधुनही सापडणार नाही, बरं हिची रूपं सुद्धा किती असावीत .. दाल कचोरी, प्याज कचोरी, राजकचोरी, डिस्कोकचोरी, बॉलकचोरी, लड्डूकचोरी, आलुकचोरी, मटारकचोरी, तूरीच्या दाण्यांची कचोरी ,ईंदौरीकचोरी, कचोरी चाट, ऊपवासकचोरी,अजूनही असतील, प्रत्येक रूपात ही जिभेला सुखावतेच , मी केलीये मधुमका कचोरी .. भन्नाट चवीची झालीये, नक्की करून पहा मैत्रिणींनो .. Bhaik Anjali -
फ्रोजन शेगाव कचोरी (Frozen Shegaon Kachori Recipe In Marathi)
#TBR'शेगाव कचोरी'सगळ्यांच्या आवडीची अशी ही शेगाव कचोरी आता आपण अगदी पटकन खाता येईल अशा पद्धतीने आपल्यासाठी तयार केली गेलेली आहे 'फ्रोजन शेगाव कचोरी 'आमच्याकडे भरपूर प्रमाणात मिळते आता आपल्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण शेगाव कचोरी खाऊ शकतो ही कचोरी टिफिन बॉक्स मध्ये द्यायला खुप सोपी पडते. मला 3 टिफिन द्यावे लागतात त्याच छोट्या ब्रेक साठी मी अशा प्रकारचा टिफिन देते माझ्या घरात सगळ्यांनाच शेगाव कचोरी आवडते म्हणून मी सकाळच्या वेळेस वेळही वाचतो टिफिन मध्ये पटकन देता येते म्हणून अशा प्रकारची फ्रोजन कचोरी आणून फ्रिजमध्ये ठेवते मी जिथून आनते त्यांना विचारले होते ही कचोरी दहा ते पंधरा दिवस डीप फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवता येते आणि आपल्याला फक्त तळावे लागते तयार शेगाव काचोरी. ही कचोरी शेगाव वरूनच तयार होऊन येते असे मला सांगितले गेले आहे नक्की माहित नाही. चव अगदी परफेक्ट आहे जी शेगाव कचोरी आहे तीच ही कचोरी आहे जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला डब्यामध्ये द्यायला खूप चांगले पडेल नक्की ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
खस्ता कचोरी (Khasta Kachori recipe in mararthi)
#hr#होळी स्पेशल#खस्ता कचोरी आज माझ्या ४०० रेसिपीज पुर्ण झाल्या म्हणून ही खास रेसिपी. Sumedha Joshi -
मूग डाळ कचोरी (moong daal kachori recipe in marathi)
आज वर्षाचा शेवटचा दिवस..म्हणून म्हटले काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट तर असलाच पाहिजे ना...म्हणून बनवली मूग डाळ कचोरीकशी वाटली सांगा.. Shilpa Gamre Joshi -
जामनगरची फेमस सुखी कचोरी (sukhi kachori reci[pe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज शेगाव कचोरी ,प्याज कचोरी, मूग डाळ कचोरी, आलू मटर कचोरी या वेगवेगळ्या कचोरी बरोबरच साधारण दहा ते पंधरा दिवस टिकणारी प्रवासात घेऊन जाण्यासाठी उपयोगाची, त्याचबरोबर अतिशय खमंग अशी जामनगरची सुकं सारण वापरून केलेली फेमस कचोरी.. ही कचोरी चहा बरोबर खाण्यासाठी अगदी उत्तम स्नॅक्स आहे.. ही कचोरी करण्यासाठी भरपूर तामझाम करावा लागतो पूर्वतयारी करावी लागते कचोरी चा पहिला घास तोंडात घातल्यावर केवळ अहाहा...हेच तोंडून येतं .. आणि आणि कचोरी करण्यासाठी घेतलेल्या श्रमांचा विसर पडतो..इतकी चवदार,चविष्ट होते ही कचोरी..मी तर पहिल्यांदाच करुन बघितली ही कचोरी..केवळ अफलातून.!!!!..हेच शब्द तोंडातून येतील.. चला रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15450223
टिप्पण्या (7)