तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

कूक स्नॅप चॅलेंज - उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद असतो गणपती बाप्पा साठी नैवेद्य म्हणून मी तळणीचे मोदक तयार केले. खूप छान व खमंग लागतात. तुम्हीही करुन पहा खूप सोपी आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात ....
#gur

तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)

कूक स्नॅप चॅलेंज - उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद असतो गणपती बाप्पा साठी नैवेद्य म्हणून मी तळणीचे मोदक तयार केले. खूप छान व खमंग लागतात. तुम्हीही करुन पहा खूप सोपी आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात ....
#gur

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅमबारीक रवा
  2. 50 ग्रॅममैदा
  3. 2 टीस्पूनतूप (मुटका होईल इतपत)
  4. चवीपुरते मीठ
  5. 1/4 कपदूध
  6. Stuffing -
  7. 150 ग्रॅम किसलेले खोबरे
  8. 125 ग्रॅमपिठीसाखर व गूळ दोन्ही अर्धे अर्धे
  9. 6-7प्रमाणे - काजू,बदाम,किसमिस
  10. 1 टेबलस्पूनखसखस
  11. 1/4 टीस्पूनवेलची पूड तळण्याकरिता तेल

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम मैदा व रव्यात तुपाचे मोहन व मीठ टाकून दुधात किंवा पाण्यात भिजवा. दोन तास झाकून ठेवा.

  2. 2

    Stuffing - सुके खोबरे किसून मंद गॅसवर पॅनमध्ये खमंग भाजून घ्या. ते एका प्लेटमध्ये काढून त्याच पॅनमध्ये खसखस भाजून घ्या.

  3. 3

    थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, किसलेला गुळ, काजू, किसमिस व बदामाचे बारीक तुकडे व वेलची पूड टाका व मिश्रण चांगले ढवळून घ्या. आपले स्टफिंग तयार झाले.

  4. 4

    दोन तासाने कणकेचा डोव्ह घेऊन थोडे थोडे मिक्सरवर फिरवून घ्या. नंतर चांगले मळून त्याचे रोल तयार करा व पुरीला तुकडे करतो त्याप्रमाणे त्याच्या लोया करा व लाटून त्यात वरील सारण भरून तोंड मिटऊन घ्या व त्याला मोदकाचा आकार देऊन मंद गॅस वर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.

  5. 5

    खूपच खमंग व चविष्ट लागतात. मी ही रेसिपी श्यामा ताई मांगले यांची स्नॅप केली. थँक्स शामताई...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या (11)

Similar Recipes