चीज शंकरपाळी (cheese shankarpale recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#diwali2021
दिवाळीमध्ये गोड शंकरपाळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही चीज वाली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी शंकरपाळी नक्की बनवून बघा.
चहा नाश्ता साठी परफेक्ट अशी ही चीझ शंकरपाळी आहे.

चीज शंकरपाळी (cheese shankarpale recipe in marathi)

#diwali2021
दिवाळीमध्ये गोड शंकरपाळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही चीज वाली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी शंकरपाळी नक्की बनवून बघा.
चहा नाश्ता साठी परफेक्ट अशी ही चीझ शंकरपाळी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनटं
4 लोक
  1. 2 कपमैदा
  2. 2 टेबलस्पूनबटर (रूम टेंपरेचर)
  3. 1/4 टीस्पूनमीठ
  4. 2 चिमूटखाण्याचा सोडा
  5. 1/2 वाटीकिसलेले चीज (प्रोसेस चीझ)
  6. 1/4 कपकोमट दूध
  7. तेल शंकरपाळी तळण्यासाठी

कुकिंग सूचना

25 मिनटं
  1. 1

    सर्वप्रथम एका बोलमध्ये मैदा चाळून घ्या. नंतर त्यामध्ये बटर,किसलेलं चीज, मीठ आणि खाण्याचा सोडा घाला. बटर आणि चीज मध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ कमी घालावे.

  2. 2

    सर्व साहित्य हाताने एकजीव करून ब्रेडक्रम्स सारखं मिश्रण तयार करून घ्या. नंतर त्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं दूध ऍड करून मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार करून घ्या. दुधा ऐवजी पाणी सुद्धा ॲड करू शकता.पीठ जास्त मऊ मळू नये. पीठ गोड शंकरपाळी साठी मळतो तसे घट्टसरच मळावे.

  3. 3

    तयार पिठाचे समान गोळे करून घ्या. एक गोळा घेउन त्याची पातळसर पोळी लाटून घ्या.

  4. 4

    तयार पोळीच्या बाजूने सुरीने कडा कापून पोळीला चौकोनी आकार देऊन घ्या. नंतर पोळीचे हव्या त्या आकाराचे चौकोनी किंवा त्रिकोणी शंकरपाळीचे छोटे छोटे काप तयार करून घ्या.

  5. 5

    कढईमध्ये तेल गरम करून घ्या.गरम तेलात शंकरपाळी मध्यम आचेवर छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या.

  6. 6

    तयार चीज शंकरपाळी चहासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

Similar Recipes