गव्हाचे शंकरपाळे (gavhyache shankarpale recipe in marathi)

Pragati Pathak
Pragati Pathak @UrsPragati

दिवाळीचे शंकरपाळे हा एक मस्त फराळ !
पण या डायट सांभाळून फराळ कसा करणार.
तर मग आपण मैदा टाळून शंकरपाळे करू.

गव्हाचे शंकरपाळे (gavhyache shankarpale recipe in marathi)

दिवाळीचे शंकरपाळे हा एक मस्त फराळ !
पण या डायट सांभाळून फराळ कसा करणार.
तर मग आपण मैदा टाळून शंकरपाळे करू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ तास
४ लोक
  1. 1/2 वाटीसाजूक तूप
  2. 2.5 वाटी गव्हाचे पीठ
  3. 1 वाटीगच्च भरून / सव्वा वाटी पिठीसाखर
  4. 3/4 वाटीपाणी
  5. वेलची पावडर चवीनुसार
  6. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

२ तास
  1. 1

    आधी परातीत पाणी घालून घ्या. त्यात सव्वा वाटी पिठीसाखर घाला. नंतर चिमूटभर मीठ आणि १ चमचा वेलची पावडर घालून साखर विरळून घ्यावी. आता या मिश्रणात जेवढं बसेल तेवढंच गव्हाचं पीठ घालून पीठ थोडं घट्टसर मळून घ्यायचं. हे पीठ १५ ते २० मिनिट बाजूला ठेवून द्या.

  2. 2

    टीप: २० - २५ मिनिटापेक्षा जास्त वेळ पीठ बाजूला ठेवू नये. नाहीतर तळताना शंकरपाळे फसफसतात.
    गरम पाण्यात पीठ मळू नये अन्यथा शंकरपाळे कडक होतात.

  3. 3

    आता लाटण्यासाठी एक एक गोळा घेऊन छान एकसारखा मळून घ्यावा. फारच भुसभुशीत वाटल्यास गव्हाचे पीठ किंवा दूध लावून गोळा मळावा. फार दूध किंवा तूप लावू नये. आणि आता लाटून झाल्यावर चिरण्याने त्याचे छोटे छोटे चौकोनी आकार पाडून घ्यावेत.

  4. 4

    शंकरपाळे तळण्यासाठी तेल गरम करून घ्यावे. आधी एक शंकरपाळे टाकून विरघळत नाही ना हे तपासून बघा.
    शंकरपाळे तळताना मंद आणि मध्यम आचेवरच तळून घ्यायचे. नाहीतर ते काळे पडतात आणि आतमधून कच्चेच राहतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Pathak
Pragati Pathak @UrsPragati
रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
MastttAll your recipes are yummy & delicious . You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes