पाकातले रवा ड्रायफ्रूट्स लाडू (pakatle rava dryfruits laddu recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#CDY

आमच्या लहानपणी माझी आई हे लाडू बनवायची. त्यात रव्याचा प्रमाण जास्त आणि ड्रायफूट चे प्रमाण मात्र जेमतेम असायचे. त्यामुळे माझे काम हे असायचे की, प्रत्येक लाडवावर लावलेल्या किसमिस लपून काढून खाणे.. 😜आणि त्या गोष्टीसाठी बरेच वेळा मार देखील मिळायचा.... 🙈😃आज बाल दिनानिमित्त ही आठवण ताजी झाली.. 🙏🏻माझ्याप्रमाणेच माझ्या मोठ्या मुलीला हे लाडू आवडतात. फरक एवढाच आहे तेव्हा ड्रायफ्रूटस चे प्रमाण कमी असायचे आता मात्र ड्रायफ्रुट्सचे प्रमाण जास्त वापरू हे लाडू करते. कारण माझ्या मोठ्या मुलीला नुसत्या ड्रायफूट चे लाडू खायला आवडत नाही. पण त्यात रवा मिक्स करून लाडू तयार केला तर लगेच लाडवाचा फडशा पडतो..
चला तर मग करुया *पाकातले रवा ड्राय फ्रूट लाडू*... 💃 💃 💕 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
2 लोक
  1. 1 कपबारीक रवा
  2. 1 कपड्राय फ्रूटची ओबडधोबड बारीक केलेली पुड
  3. 1 टेबलस्पूनविलायची पावडर
  4. 1/2 कपतुप
  5. 1/2 कपसाखर
  6. 1/4 कपपाणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम रवा बारीक चाळणीने चाळून घ्यावा. नंतर पॅनमध्ये तूप घालून रवा तुपावरती थोडासा गोलि कलर बदलेस्तोवर परतून घ्यावा व नंतर यामध्ये ड्रायफूटची ओबडधोबड केलेली पावडर घालावी. एक ते दोन मिनिटे परतल्यानंतर गॅस बंद करून द्यावा.

  2. 2

    दुसरीकडे दुसर्‍या पॅनमध्य साखर घालावी. साखरेच्या अर्धे पाणी घालून एकतारी पाक तयार करून घ्यावा.

  3. 3

    हा पाक भाजलेल्या रव्यामध्ये थोडा थोडा मिक्स करावा. (एवढाही पाक एकाच वेळेस घालू नये.) चांगले मिक्स करुन पाच मिनिटे झाकून ठेवावे. व नंतर त्याचे लाडू बांधून घ्यावे.

  4. 4

    तयार आहे आपले *पाकातले रवा ड्रायफ्रूट्स लाडू*... 💃 💕 💃

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes