पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
सतरा घटक
  1. 1जुडी पालक
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं
  6. 1 टेबलस्पूनजिर
  7. 1/2 टेबलस्पूनमोहरी
  8. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  9. 1-1.5 टेबलस्पून तिखट
  10. 1/2 टेबलस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पूनधने पूड
  12. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  13. 2-3 टेबलस्पूनतेल
  14. 1 टेबलस्पूनतूप
  15. 250 ग्रॅम पनीर
  16. 2 टेबलस्पूनफ्रेश क्रीम
  17. प्रमाणात मीठ

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    पालक स्वच्छ धुऊन गरम पाण्यामध्ये पाच मिनिटे उकळून घ्या. तसेच पनीर स्वच्छ धुऊन त्याचे काप करून घ्या. आणि पॅनमध्ये तूप घालून पनीर फ्राय करून घ्या.

  2. 2

    वरील दिलेल्या भाज्या कट करून घ्या. पॅनमध्ये तेल घालुन जीर, आलं-लसूण, कांदा टमाटर मिक्स करून पाच मिनिटे शिजवून घ्या थंड झालेलं मिश्रण आणि पालक मिक्स करून मिक्सरच्या पॉट मध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घ्या.

  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करून जीरे,मोहरी, हळद तिखट, गरम मसाला, धने पावडर, प्रमाणात मीठ घालून मिक्स करून घ्या, लगेच पालकाची प्युरी घालून मिक्स करून घ्या नंतर कसूरी मेथी घाला. पालकाची पेस्ट पाच मिनिटे उकळून घ्या. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घाला.

  4. 4

    उकळत्या पालका च्या ग्रेव्ही मध्ये तुपामध्ये फ्राय केलेले पनीर घाला. आणि पाच मिनिटे उकळी येऊ द्या. आवडत असल्यास वरुन बटर घाला.उकळी आल्यानंतर दोन चमचे फ्रेश क्रीम घाला. तयार आहे आपली गरमागरम पालक पनीरची भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

Similar Recipes