प्याज वाली भिंडी (pyaaz wali bhendi recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

आजपर्यत आई च्या हातची फक्त लहसून आणि मिरची वाली भेंडी खात आले होते . पण ती भाजी खाऊन कंटाळा आला .म्हणून भिंडीवर थोडे एक्सपिरीमेंट करायला सुरुवात केली .त्यामध्ये ही प्याज वाली भिंडी अप्रतिम लागते .म्हणून तुमच्या सोबत शेअर करत आहे .
#EB2 #W2

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20 मिनिटे
2 लोकांसाठी
  1. 1/4 किलोभींडी
  2. 2 पळी तेल
  3. 9-10 लसूण पाकळ्या
  4. 2हिरवी मिरची
  5. 2 कांदे
  6. 1 टोमॅटो
  7. 1/2 टेबलस्पून आल,लसूण पेस्ट
  8. 1 टेबलस्पून लाल तिखट
  9. 1 टेबलस्पून धणे,जीरे पूड
  10. 1/2 टेबलस्पूनराई
  11. चुटकी भर हिंग
  12. 1/2 टेबलस्पूनआमचूर पावडर (ऑप्शनल)
  13. 1/2 टेबलस्पूनहळद पावडर
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    पाव किलो भिंडी स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यावी व थोड्या मोठ्या अशा आकारात कापून घ्यायची. एक कांदा बारीक चिरून घ्यायचा व दुसऱ्या कांद्याचे चार भाग करून त्याचे पडदे वेगळे करून घ्यायचे.दोन मिरच्या चिरून घ्यायच्या. व लसूण पाकळ्या ठेसून घ्याव्यात.

  2. 2

    सर्व तयारी झाल्यानंतर गॅस वर एका कढईत थोड तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये भेंडी चे काप टाकून पाच मिनिट शेलो फ्राय करून घ्यायची.

  3. 3

    भेंडी चांगली खरपूस भाजून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यावी. व त्याच कढईत दोन पळी तेल गरम करून घ्यावे. व त्यामध्ये मोहरी, हिंग टाकावे.मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये ठेचलेला लसूण व चिरलेली हिरवी मिरची टाकावी. व लसूण थोडा सोनेरी झाल्यावर या मध्ये बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यावा.

  4. 4

    हे झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो आणि अद्रक,लाहसून पेस्ट टाकून चांगले शिजवून घ्यावे.हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर,धने जीरे पूड,हळद टाकून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावे.

  5. 5

    व त्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेली भेंडी व ज्या कांद्याचे आपण पडदे वेगळे केले होते ते टाकून छान पैकी एकजीव करावे.त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून परतून घ्यावे. व झाकण ठेवून मंद आचेवर ठेवावे.अधून मधून चेक करत राहावे.तुम्हाला जर चिकटपणा जाणवत असेल तर वरतून आमचूर पावडर टाकावी.त्याने भिंडी चिकट होत नाही.अशीही आमचूर पावडर टाकली तरी चव चांगली येते.

  6. 6

    भेंडी कच्ची वाटत असेल आणि मसाला कढईला लागत असेल तर एक,दोन पाण्याचे हबकारे मारावे. व झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावे.आपली प्याज वाली भिंडी खाण्यासाठी तयार आहे.ही भाजी चपाती सोबत या वरण भातासोबत तुम्ही खाऊ शकता.एकदा नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

Similar Recipes