कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
Thane

#EB2 #w2
नेहमी एकाच पद्धतीने केलेली भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो ,कधीतरी चटपटीत खावेसे वाटते तेव्हा ही कुरकुरीत भेंडी फ्राय करा आणि मुल सुद्धा ही कुरकुरीत भेंडी आवडीने खातात

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20मिनिट
4 लोकांसाठी
  1. 250 ग्रॅमभेंडी
  2. 1 वाटीमैदा
  3. 1/2 वाटीबेसनपीठ
  4. 2 टीस्पूनलालमिरची पावडर
  5. 1 टीस्पूनधने
  6. 1 टीस्पूनजीरे पावडर
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. चवीनुसार मीठ
  9. भेंडी तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    भेंडी स्वच्छ धुवून व कपड्याने पुसून घेऊन उभी चिरून घ्यावी

  2. 2

    चिरून घेतलेल्या भेंडी मधे बेसनपीठ,मैदा,धणे,जीरे पावडर,हळद,चवीनुसार मीठ घालून ते सर्व भेंडीला लावून घ्यावे.(पाणी न घालता सर्व जिन्नस लावावे)

  3. 3

    नंतर गॅसवर कढई ठेऊन त्यात तेल घालावे व तेल चांगले गरम होवू देणे

  4. 4

    तेल गरम झाल्यावर त्यामधे भेंडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणे

  5. 5

    अशारितीने आपली कुरकुरीत भेंडी फ्राय खाण्यासाठी तयार
    ही भेंडी तुम्ही साॅस बरोबर कींवा चटणी बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

Similar Recipes