मेदूवडा सांबार (medu vada sambar recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

माझी सर्वात आवडती रेसिपी .जी मी खूप उशिरा शिकले
पण बनवल्यावर उडपी वाला फिल येतो

#EB6 #W6

मेदूवडा सांबार (medu vada sambar recipe in marathi)

माझी सर्वात आवडती रेसिपी .जी मी खूप उशिरा शिकले
पण बनवल्यावर उडपी वाला फिल येतो

#EB6 #W6

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3 ते 4 लोक
  1. 250 ग्रॅमउडीद डाळ
  2. मुठभर तांदूळ
  3. मुठभर चना डाळ
  4. 1/2 टीस्पून मेथी दाणे
  5. 1 वाटीतुर डाळ
  6. दुधी भोपळा
  7. 3-4 कापलेले कांदे
  8. लाल सुकी मिरची
  9. 3-4 पळी तेल
  10. लसूण पाकळ्या
  11. शेवगा ची शेंग
  12. 3-4 टोमॅटो
  13. चिंच
  14. गूळ
  15. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  16. 2-3 टेबलस्पुनसांभर मसाला
  17. 1/2 टेबलस्पून हळद
  18. 1/2 टेबलस्पून हिंग
  19. 1 टेबलस्पून मोहरी
  20. 1 टेबलस्पून जीरे
  21. 3-4 हिरवी मिरची
  22. कोथंबिर
  23. पुदिना
  24. खोबरे
  25. फुटण्याची डाळ
  26. 1/2 टेबलस्पून मिरी पावडर
  27. चवी नुसार मीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    रात्रि झोपताना उडीद डाळ,तांदूळ व चना डाळ स्वच्छ पाण्याने धुवून रात्र भर भरपूर पाण्यात भिजवून घ्यावे. व सकाळी मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.फक्त वाटताना पाण्याचा वापर शक्यतो करू नका.अगदी थोडे गरजेपुरते पाणी टाका.

  2. 2

    मिश्रण वाटून झाल्यावर त्या.अध्ये एक चमचा जीरे,कापलेला कडीपत्ता,बारीक चिरलेला कांदा,हिरवी मिरची,बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरी पावडर व चवी नुसार मीठ टाकून चांगले एकजीव करा.

  3. 3

    कढई मध्ये तेल गरम करून घ्या. व तळ हातावर पाणी लावून त्यावर एक छोटा गोळा पिठाचा गोळा ठेवून त्यामध्ये बिळ पाडून तो गोळा दुसऱ्या हाताच्या बोटांवर ठेवून अलगद तेलात सोडा व मिडीयम आचेवर चांगले गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्या.आपले मेदू वडे तयार आहेत.

  4. 4

    तुरीची डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्या व दुधी भोपळा व शेवगा ची शेंग कापून घ्या.एका कुकर मध्ये तूर डाळ,दुधी भोपळा,अर्धा चमचा हिंग,अर्धा चमचा हळद,चिरलेले दोन कांदे व चवीनुसार मीठ टाकून तीन ते चार शिट्टी येईपर्यंत शिजवा
    व दुसऱ्या बाजूला चिंच भिजत ठेवा
    व टोमॅटो ची पेस्ट करून घ्या. व शेवगा वेगळा शिजवून घ्या.

  5. 5

    एका कढईत दोन पळी तेल गरम करून त्या मध्ये मोहरी,कडीपत्ता, सात आठ मेथी दाणे,अर्धा चमचा उडीद डाळ,चिमुटभर हिंग व सुकी लाल मिरची टाकून तडका द्या.फोडणी चांगली बसल्यावर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून लगेच टोमॅटो पेस्ट टाका व तेल सुटेपर्यंत शिजवा.

  6. 6

    यानंतर शिजवलेली डाळ टाकून चांगले मिक्स करा. व त्यामध्ये चिंचेचा कोळ,गूळ व सांभर मसाला व चवी नुसार मीठ टाकून चांगली उकळी येऊ द्या. व वरतून चिरलेली कोथिंबीर टाका. तुम्हाला आवडत असेल तर वरतून खोवलेले ओले खोबरे टाका. सांभर तयार आहे.

  7. 7

    चटणी - चटणी बनवण्यासाठी एक वाटी पुदिना आणि कोथबिर घ्या. व त्यामध्ये दोन हिरवी मिरची,मूठभर फुटण्याची डाळ,अर्ध वाटी ओले खोबरे व तीन चार लसूण पाकळ्या व मीठ टाकून पाण्याच्या सहायाने मिक्सर मध्ये बारीक चटणी वाटून घ्या.

  8. 8

    त्यानंतर वरतून फोडणी देण्यासाठी अर्धा पळी गरम तेलात अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा उडीद डाळ,दोन सुकी लाल मिरची,चिमुटभर हिंग टाकून चांगले तडतडू द्या व गरम फोडणी चटणी वर सोडा.आपली हिरवी चटणी तयार आहे

  9. 9

    अशा प्रकारे अथंग परिश्रमानंतर आपले मेदु वडा सांभर व चटणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes