गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

माझी फेवरेट रेसिपी .नॉनव्हेज म्हटले की माझा जीव की प्राण .त्यात मी गावची असल्यामुळे गावरान मटण हे बनवणं अवघड नाहीच .

गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)

माझी फेवरेट रेसिपी .नॉनव्हेज म्हटले की माझा जीव की प्राण .त्यात मी गावची असल्यामुळे गावरान मटण हे बनवणं अवघड नाहीच .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 लोक
  1. 1 किलोमटण
  2. गरजे नुसार पाणी
  3. 1/2 वाटीदही
  4. 8-9 कांदे
  5. 4-5 टोमॅटो
  6. 2-3 हिरवी मिरची
  7. आले लसूण पेस्ट
  8. 1/2 वाटी सुके खोबरे
  9. 1/2 टेबलस्पून जीरे
  10. 2-3 तेज पत्ता
  11. 3-4 लवंग
  12. 1 तुकडा दालचिनी
  13. 3-4 पळी तेल
  14. 1 टेबलस्पूनहळद पावडर
  15. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  16. 1 टेबलस्पूनधणे पावडर
  17. 1 टीस्पूनमटण मसाला
  18. कसुरी मेथी
  19. कोथीबिर
  20. चवी नुसार मीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम मटण स्वच्छ धुवून घ्यावे.त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद,एक चमचा लाल तिखट,मीठ,एक चमचा आले लसूण पेस्ट व दोन ते तीन चमचे दही टाकून चांगले एकजीव करावे. व दहा मिनिटे मुरायला ठेवावे.

  2. 2

    तीन ते चार कांदे उभे चिरून घ्यावे.दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. व एका कुकर मध्ये एक पळी तेल टाकून कांदा लालसर होऊ द्यावा.त्यानंतर टोमॅटो टाकून चांगले शिजवून घ्यावे. व त्यात मीठ व हळद टाकून चांगले मिक्स केल्यावर मटण टाकावे.

  3. 3

    मटण चांगले एकजीव केल्यानंतर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवून वाफेवर शिजवत ठेवावे.पाणी अजिबात टाकायचे नाही.मटणाला पाणी सुटते.त्यातच मिडीयम आचेवर चांगले शिजवावे. अशाने मटणाला कचवट वास येत नाही.

  4. 4

    त्यानंतर या मध्ये गरजेनुसार गरम पाणी टाकावे.थंड पाणी अजिबात टाकायचे नाही
    व कुकर ला झाकण लावून चांगल्या सात ते आठ शिट्ट्या घेऊन मटण शिजवावे.

  5. 5

    आता चार ते पाच कांदे उभट चिरावे.खोबरे कापून घ्यावे.त्यानंतर थोड्या शा तेलात कांदा चांगला भाजून घ्यावा
    थोडा काळपट करावा. व त्या मध्ये खोबरे टाकून ते पन असेच काळपट होई पर्यंत फ्राय करावे.

  6. 6

    हे मिश्रण थंड झाल्यावर याची बारीक पेस्ट करून घ्यायची. व तीन ते चार टोमॅटो,दोन हिरवी मिरची व मूठभर कोथंबीर याची सुध्दा वेगळी पेस्ट करून घ्यायची.

  7. 7

    आता एक पातेले घ्यावे.ते गॅस वर ठेवून त्यात दोन ते तीन पळी तेल टाकावे. व तेजपत्ता,दालचिनी,जीरे,लवंग चा तडका द्यावा. व कांदा आणि खोबऱ्याच वाटण टाकून चांगले एकजीव करावे.

  8. 8

    यानंतर यामध्ये आले लसूण पेस्ट टाकून चांगले तेल सुटे पर्यंत शिजवून मिडीयम आचेवर शिजवून घ्यावे. व त्यामध्ये टोमॅटो आणि कोथींबीर चे वाटण टाकून पाच मिनिटे चांगले परतून घ्यावे.तुम्ही मसाला जितका जास्त भाजून घ्याल.तितकी चव चांगली येईल.

  9. 9

    यानंतर यामध्ये चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट,दोन चमचे धने पूड व कसुरी मेथी व गरजे नुसार मीठ टाकून चांगले परतून घ्यावे.त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून दोन मिनिटे शिजवून घ्यावे.

  10. 10

    यानंतर या मसाल्यात शिजवलेले मटण टाकून चांगले पाच मिनिटे एकजीव करावे.त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे मटण मसाला टाकावा. व पुन्हा परतून घ्यावे. व वरती झाकण ठेवून त्यात पाणी गरम करायला ठेवावे.गॅस मंद ठेवावा.

  11. 11

    तुम्हाला हवे तितके पाणी असेच ताटावर गरम करून मटण मध्ये टाकावे. व चांगली उकळी येऊ द्यावी.त्यानंतर चवीनुसार मीठ व चिरलेली कोथिंबीर टाकावी.आपला गावरान मटण रस्सा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes