कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

अगदी झटकीपट बनतो . नाश्ता साठी तुम्ही चहा सोबत बनवू शकता .

कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)

अगदी झटकीपट बनतो . नाश्ता साठी तुम्ही चहा सोबत बनवू शकता .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 लोक
  1. 1 वाटीकोबी बारीक चिरलेला
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1/2 चमचाजीरे
  4. 1/2 टेबलस्पून कसुरी मेथी
  5. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली
  7. 1 चमचालाल तिखट
  8. मुठभर कोथिंबीर चिरलेली
  9. भिजवलेले कणीक
  10. तेल
  11. गरजे नुसार पाणी
  12. चवी नुसार मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. व कांदा आणि मिरची ही चिरून घ्या. व गव्हाचे कणीक मळून घ्या.

  2. 2

    एका कढईमध्ये अर्धी पळी तेल गरम करून त्यात जीरे आणि मिरची चा तडका द्या.त्यानंतर कांदा हलका शिजवून घ्या. व त्यामध्ये आले,लसूण पेस्ट,लाल तिखट,कसुरी मेथी व मीठ टाकून मिक्स करा. व त्यामध्ये कोबी टाकून चांगले परता. फक्त जास्त शिजवू नका.पाणी सुकेल अस शिजवा.

  3. 3

    कणकेचे गोळे करून त्यामध्ये पुरण भरतात तसे कोबी चे सारण भरून त्याचे पराठे करून घ्यावे.

  4. 4

    व तव्यावर दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून चांगले खरपूस भाजून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes