तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#EB12 #W12
या विक मधील तंदुरी रोटी...
ही पोळी मैदा आणि कणिक दोन्ही ची बनवता येते.
गरमा गरम छान लागते...

तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)

#EB12 #W12
या विक मधील तंदुरी रोटी...
ही पोळी मैदा आणि कणिक दोन्ही ची बनवता येते.
गरमा गरम छान लागते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
  1. 1 वाटीमैदा
  2. 1 टीस्पूनमीठ
  3. चिमूटभरबेकिंग पावडर
  4. 1 चमचातेल
  5. कणिक मळण्यासाठी थोडे पाणी
  6. बटर/तूप

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य तयार ठेवा.

  2. 2

    मैदा चाळून घ्या व त्यात मीठ, बेकिंग पावडर घालून मिक्स करा.

  3. 3

    आता तेल घालुन मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता लागेल एवढे पाणी घालून कणीक मळून घ्या. एकदम घट्ट नको किंवा सैल नको.

  5. 5

    आता यावर अजून १ चमचा तेल लावून गोळा ५-१० मिनिट झाकून ठेवा.

  6. 6

    १० मिनिट नंतर परत मळून घ्या व एक छोटा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटून घ्या. तवा तापत ठेवा.

  7. 7

    आता पोळीचा वरच्या भागात हाताने पाणी लावून घ्या व ती बाजू गरम तव्यावर टाकून भाजुन घ्या.

  8. 8

    पोळीला थोडे बबल आले की तवा उलटा करून तव्यावर चीपकुन असलेली पोळी गॅस वर छान भाजुन घ्या.

  9. 9

    तंदुरी रोटी तयार आहे गरमा गरम पोळीला बटर/ तूप लावून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes