भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#BKR
#ह्या भाजीला करायला वेळ लागतो पण छान होते अजिबात चिकट होत नाही कमी तिखट केली तर लहान मुलांना ही आवडते .अवश्य करून बघा.

भेंडीची चटकदार भाजी (Bhendichi Bhaji Recipe In Marathi)

#BKR
#ह्या भाजीला करायला वेळ लागतो पण छान होते अजिबात चिकट होत नाही कमी तिखट केली तर लहान मुलांना ही आवडते .अवश्य करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमभेंडी
  2. 2 टेबलस्पूनओले खोबरे
  3. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कुट
  4. 2 टेबलस्पूनचण्याचे पीठ
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनगोडा मसाला
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  11. 1 टीस्पूनसाखर
  12. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    खालील प्रमाणे तयारी करावी. भेंडी धुवून पुसून नंतर उभी चिरून घ्यावीत.

  2. 2

    पॅन मधे 4टेबलस्पून तेल घालून भेंडी फ्राय करून घेणे.लिंबाचा रस टाकून परत थोडी फ्राय करणे.आता चण्याचे पीठ बाजूला ठेवून वरील मसाले, खोबरे, दाण्याचे कूट भाजीवर पसरवून टाकणे नी भाजी सारखी परतत रहा.10/15 मिनीटानी चण्याचे पीठ घाला नी साधारण 15/20 मिनिटे परता थोडी भेंडी क्रीस्पी वाटली की गॅस बंद करा.

  3. 3

    भेंडीची चटकदार थोडी कुरकुरीत भाजी तयार आहे.चपातीबरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes