गवारीची भाजी (Gavarichi Bhaji Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#BKR
गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट, सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून केलेली भाजी छान लागते. चला तर मग बघूया गवारीची भाजी 👍

गवारीची भाजी (Gavarichi Bhaji Recipe In Marathi)

#BKR
गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट, सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून केलेली भाजी छान लागते. चला तर मग बघूया गवारीची भाजी 👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 500ग्रॅम गवार साफ करून तोडून घेतलेली
  2. 1टोमॅटो बारीक चिरून
  3. 1टीस्पून जिरंं मोहरी
  4. हिंग
  5. 2कांदे बारीक चिरून
  6. 4टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट
  7. 2टेबलस्पून लाल तिखट/ काळा मसाला
  8. 1/2टेबलस्पून हळद
  9. 4टेबलस्पून लसूण आले कोथिंबीर
  10. आणि भाजलेल्या सुक्या खोबर्‍याचे वाटण
  11. आवडीनुसार कढीपत्ता आणि कोथिंबीर
  12. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    गवार स्वच्छ धुवून घ्यावी. प्रत्येक गवारीची दोन्ही बाजूची देठं मोडावीत आणि शिर असेल तर काढून टाकावी. गवारीचे १/२ ते १ इंचाचे तुकडे मोडून घ्यावेत.
    कढईत तेल घालून गरम झाल्यास त्यात जिरं मोहरी घातले जिर मोहरी तडतडले की लसूण, कांदा कढीपत्ता घालून कांदा गुलाबीसर करून घेतला आणि त्यात हळद, काळा मसाला घालून मिक्स केले.

  2. 2

    शेंगदाणे कूट आणि वाटण घालून नीट परतून घ्यावे. त्यामध्ये गवार आणि टोमॅटो घालून मिक्स करून घेतले झाकण ठेवून पाच मिनिटे कमी आचेवर परतून घेतली ळणि नंतर त्यात पाणी मीठ घातले आणि छान ढवळून घेतले. उकळी आली की झाकण ठेऊन 15 मिनिट गवार शिजवून घेतले. भाजी शिजली की कोथिंबीर पेरावी.

  3. 3

    यातल्या लाल तिखटामुळे भाजीला छान रंग येतो आणि दाण्याच्या कुटामुळे ती चवीलाही छान लागते.
    हि भाजी पोळीबरोबर किंवा गरमगरम तूप-वरण-भाताबरोबर झकास लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes