रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

रव्याचा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ जणांसाठी
  1. 200 ग्रॅमरवा
  2. 4 टे. स्पून साजुक तूप
  3. 2कांदे बारीक चिरून
  4. 1गाजर बारीक चिरून
  5. 1 मूठभरशेंगदाणे
  6. 1टोमॅटो बारीक चिरून
  7. 3हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  8. 10-12कढीपत्त्याची पाने
  9. 1 टीस्पूनबारीक चिरलेल आल
  10. 1/2 वाटीखवलेल खोबर
  11. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 1 टे. स्पून उडदाची डाळ
  13. 1 टीस्पूनमोहरी
  14. 1/2 टीस्पूनहींग
  15. 3 टे. स्पून तेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम एका कढईत ३ टे. स्पून तूप तापवून त्यांत रवा खमंग भाजून घेतला व बाजूला करून ठेवला.

  2. 2

    नंतर त्याच कढईत तेल तापवून त्यांत मोहरी, उडीद डाळ,शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, आल आणि हींग घालून छान परतवून घेतले.

  3. 3

    नंतर त्यांत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व गाजर घालून परत परतवले व ३ कप पाणी घालून चवीनुसार मीठ व साखर घातले व कांदा गाजर छान शिजेपर्यंत झाकण देऊन पाण्याला उकळी काढली.

  4. 4

    नंतर त्यांत भाजलेला रवा घातला व एकजीव करून झाकण देऊन एक वाफ काढली व त्यावर राहीलेले साजुक तूप घालून पुन्हा एकजीव करून घेतले व खोबर कोथिंबीरीने सजवून गरमागरम उपमा सर्व्ह
    केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

Similar Recipes