रव्याचा ऊपमा (Ravyacha Upma Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

रव्याचा ऊपमा (Ravyacha Upma Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
५ जणांसाठी
  1. 250 ग्रॅमरवा
  2. 3 टे. स्पून साजुक तूप
  3. 3 टे. स्पून तेल
  4. 1/2 टीस्पूनमोहरी
  5. 1 टे. स्पून उडीद डाळ
  6. 3हीरव्या मिरच्या बारीक चिरून
  7. 1/2 इंचआल बारीक चिरून
  8. 6-7कढीपत्त्याची पाने बारीक चिरून
  9. 2कांदे बारीक चिरून
  10. 1छोट गाजर बारीक चिरून
  11. 2टोमॅटो बारीक चिरून
  12. 100 ग्रॅमसोललेले मटार
  13. चवीनुसारमीठ
  14. चवीपुरती साखर
  15. 1/2 वाटीखवलेल ओल खोबर
  16. 1/4 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  17. 1/2 वाटीबारीक शेव
  18. लिंबाच्या फोडी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम २ टे. स्पून साजुक तुपावर रवा खमंग भाजून घेतला व नंतर त्याच कढईंंत ३ टे. स्पून तेल तापवून त्यांत मोहरी, उडीद डाळ, हींग, मिरची, आल, कढीपत्त्याची पाने चांगले सवताळून घेतले.

  2. 2

    नंतर त्यांत चिरलेला कांदा, गाजर, मटार दाणे, टोमॅटो घालून चांगले सवताळून त्यांत मीठ व साखर व रव्याच्या ३ पट पाणी घालून झाकण देऊन पाणी छान ऊकळू दिले.

  3. 3

    नंतर पाणी उकळल्यावर त्यांत भाजलेला रवा घातला व सर्व जिन्नस एकजीव करून ५-६ मिनीटे झाकून दणदणीत वाफ काढून घेतली, झाला मऊ लुसलुशीत उपमा तयार.

  4. 4

    नंतर गरमागरम ऊपमा त्यावर ओल खोबर, कोथिंबीर, लिंबाची फोड व बारीक शेवेने सजवून वाफाळलेल्या
    चहासोबत सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes