दिवाळी विशेष भाजणीच्या चकल्या (Bhajni‌chya ‌Chaklya Recipe In Marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#DDR
चकली शिवाय दिवाळी फराळ हा अपूर्णच. म्हणून खास दिवाळी विशेष भाजणीच्या चकलीची रेसिपी तुमच्यासाठी.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1/2 किलोभाजणीचे पीठ
  2. 5 टेबलस्पूनतेल मोहनसाठी
  3. 10 ते 12 हिरव्या मिरच्या
  4. आले लसुण
  5. 1 टेबलस्पूनतिखट
  6. 2 टीस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनओवा
  8. 1 टेबलस्पूनतीळ
  9. चवी नुसारमीठ
  10. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  11. तळण्यासाठी तेल
  12. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    भाजणीच्या पिठात 3 चमचे गरम तेलाचे मोहन घालून घ्यावे.
    आले लसुण, हिरवी मिरची, कढी पत्ता यांची एकत्र पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    एका कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात एकत्र केलेली पेस्ट शिजवून घ्यावी. त्यात ओवा, तीळ, तिखट, हळद, आमचूर पावडर आणि चवी नुसार मीठ घालून 2 मिनिटे शिजवून घ्यावे. त्यानंतर पाणी टाकून गरम होऊ द्यावे दोन उकळी आल्यावर गॅस बंद करावी.

  3. 3

    गॅस बंद केल्यावर उकडीचे पाणी थंड होऊ द्यावे त्यानंतर भाजणीचे पीठ त्या पाण्याने मळून घ्यावे व दहा मिनिटं झाकून ठेवून द्यावे. दहा मिनिटांनी पुन्हा एकदा पीठ मळून घ्यावे त्याचे गोळे करून घ्यावे व चकलीच्या साच्याने चकली करून घ्यावी.

  4. 4

    तयार झालेल्या चकल्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्या. व हलक्याशा ब्राऊन रंग येऊ द्यावा. व काढून घ्यावे. या चकल्या थंड झाल्यावर छान कुरकुरीत होतात थंड झाल्यावर छान डब्यात भरून ठेवून द्याव्या.

  5. 5

    भाजणीच्या चकल्या दिवाळी फराळात सर्व कराव्यात.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

Similar Recipes