पौष्टिक पेज सार व भात (Paushtik Saar Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#VNR
पौष्टिकता ही प्रत्येक पदार्थाची जमेची बाजू असते. असं म्हणतात कीं ,संपूर्ण जेवणाचं सार ज्यात असतं , तो पदार्थ म्हणजे हे पेजेचं सार !! हा पारंपारिक पदार्थ आहे . भाताची वेळून काढलेली पेज , घोटलेलं वरण , चिंच , गुळ व हिंगाची , तुपाची खमंग फोडणी....म्हणजे सगळेच पोषक घटक .. असं पौष्टिक सार आज केलंय .
आमच्या लहानपणी गरमागरम सार -भात हाच आमचा नाश्ता असायचा . हे करताना आजी व आईची ,तीव्रतेने आठवण झाली .हे सार करायला सोपे , पचायला हलके व स्वादाला रुचकर ..
तुम्ही पण करून , याचा आस्वाद घ्या
आता कृती पाहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2 व्यक्ती
  1. सार
  2. 1 कपपेज
  3. 1 कपपाणी
  4. दीड टेबलस्पून किसलेला गूळ
  5. 1/2 टीस्पूनतूर डाळ
  6. अडीच इंच चिंच
  7. 1लाल मिरची
  8. 7-8कढीपत्ता पाने
  9. 1/2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर चिमूटभर लाल तिखट
  10. चिमूटभरहळद
  11. चिमूटभरहिंग पूड
  12. चवीपुरते मीठ
  13. दीड टेबलस्पून तूप
  14. भात
  15. 1 कपतांदूळ
  16. सव्वा 3 कप पाणी
  17. 1/2 टीस्पूनतूप
  18. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    भात
    गॅसवर भांड्यात पाणी ओता.त्यांत तूप व मीठ टाका.पाणी उकळू लागल्यावर, त्यांत तांदूळ टाका व तो ढवळून, मिडीयम गॅस फ्लेमवर झाकण झाकून, भात शिजण्यास ठेवा. 10 -12 मिनिटानंतर, साधारणतः भात होत आल्यावर, त्यातील पाणी (पेज) एका भांड्यात वेळून काढा. पुन्हा भाताच्या भांड्यावर, झाकण झाकून, तो मंद आचेवर वाफण्यास ठेवा. 5 - 10 मिनिटांनी गॅस बंद करा व तो भात वाफेने शिजू द्या.

  2. 2

    सार ::
    1कप पाणी गरम करून,त्यांत चिंच व गूळ भिजत टाका. 10 -15 मिनिटांनी, तो कुस्करून त्याचा कोळ तयार करा. तो कोळ गाळून, वेळून काढलेल्या पेजेत ओता व छान मिक्स करा. शिजलेली डाळ घोटून तयार करा.
    गॅसवर भांड्यात तुपाची फोडणी करा. त्यांत हिंग, मोहरी, जीरे टाका. ते तडतडल्यानंतर, त्यांत मेथ्या,कडीपत्ता, लाल मिरची व हळद टाकून खमंग फोडणी करा. त्यांत पेजेचे मिश्रण ओता.घोटलेलं वरण त्यांत टाका.वरून चिमूटभर तिखट, चवीनुसार मीठ टाका व हे सार 5 - 10 मिनिटे छान उकळू द्या. सार तयार.

  3. 3

    गरमागरम पौष्टिक सार तयार.. ते सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घाला व गरम भाता वर साजूक तूपाची धार सोडून त्याच्या बरोबर सार वाढा.,
    न्यारीच लज्जत लुटा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या

Similar Recipes