सार (saar recipe in marathi)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

#golden apron 3 week 25
महाराष्ट्रीयन लोक वेगवेगळे सण साजरे करतात.त्यावेळेस सार हा पदार्थ हमखास बनवला जातो पुरणपोळी, सार, भात, आमरस ,कुरडई ,भजे ,पापड, ही तर उन्हाळ्यातील खास मेजवानी. अशा मेजवानी मध्ये खास करून तिखट खवय्यांचं सारा कडेच लक्ष असते.

सार (saar recipe in marathi)

#golden apron 3 week 25
महाराष्ट्रीयन लोक वेगवेगळे सण साजरे करतात.त्यावेळेस सार हा पदार्थ हमखास बनवला जातो पुरणपोळी, सार, भात, आमरस ,कुरडई ,भजे ,पापड, ही तर उन्हाळ्यातील खास मेजवानी. अशा मेजवानी मध्ये खास करून तिखट खवय्यांचं सारा कडेच लक्ष असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
3 जणांसाठी
  1. 3कांदे
  2. 1 टेबलस्पून चना डाळ
  3. तुकडाआल
  4. 5-6लसूण पाकळ्या
  5. कोथंबीर व कढीपत्ता
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1टिस्पून कांदा लसूण मसाला
  8. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. आवश्यकतेनुसार मीठ
  11. गरजेनुसार पाणी
  12. 2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम कांदा उभा चिरून घ्यावा व भाजत घालावा. भाजतअसताना त्यात तेल घालावे.

  2. 2

    कांदा भाजून झाल्यानंतर चना डाळ भाजून घ्यावी

  3. 3

    आता मिक्सरमध्ये भाजलेला कांदा चणाडाळ कोथिंबीर कढीपत्ता लसुन आलं घालून बारीक पेस्ट तयार करावी.

  4. 4

    आता कढईत तेल घालून तेल गरम झाल्यानंतर आपण वाटलेले मिश्रण त्यात घालावे व लाल तिखट मीठ हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला घालून मसाला चांगला परतून घ्यावा.

  5. 5

    व आवश्यकतेनुसार पाणी घालून सार तयार करावा हा सार अतिशय चविष्ट लागतो भाकरी व भातासोबत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes