ढाबा स्टाईल मसाला भेंडी (Dhaba Style Masala Bhendi Recipe In Marathi)

ढाबा स्टाईल मसाला भेंडी (Dhaba Style Masala Bhendi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम भेंडी छान छोट्या छोट्या आकाराच्या निवडून घ्या. पाण्याने स्वच्छ धुवून आणि नंतर पुसून घ्या. मध्ये एक काप द्या. अशाप्रकारे सर्व भेंड्या चीरून घ्या. आता चिरलेल्या भेंडी मध्ये हळद आणि मीठ घालुन मिक्स करून 10 मिनिटे बाजुला ठेवा.
- 2
तोपर्यंत मिक्सर च्या पॉट मध्ये टोमॅटो, अद्रक आणि मिरचीची पेस्ट बनवून घ्या. एका वाटी मध्ये बेसन, तिखट, हळद, धणे पूड आणि चवीनुसार मीठ घालून पाणी घालून मिक्स करून घ्या.
- 3
आता कढईत तेल तापवून घ्या. त्यात हळद आणि मीठ घालुन ठेवलेली भेंडी 5 ते 6 मिनिट शिजवून घ्या. त्यानंतर शिजलेली भेंडी एका ताटात बाजुला काढून ठेवा.
- 4
आता त्याच तेलात भिजवून ठेवलेले बेसन घालून 1 मिनिट परतून घ्या. टोमॅटो ची पेस्ट घालून मिक्स करून घ्या. तेल सुटे पर्यंत परतून घ्या. आता दही घालून पुन्हा 1 मिनिट परतून घ्या.
- 5
आता शिजलेली भेंडी मिक्स करून 1 मिनिट झाकून ठेवा. 1 मिनिटांनी गॅस बंद करा.
- 6
गरमागरम ढाबा स्टाईल मसाला भेंडी पोळी किंवा पराठा सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच भेंडी ही भाजी आरोग्यासाठी फारच महत्त्वाची आहे. कारण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. भेंडीमध्ये अ जीवनसत्व असते. ते आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवते.भेंडीमध्ये युगेनॉल असते. हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. भेंडीमुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. अशा या बहुगुणी भेंडीची हि वेगळ्या प्रकारची भाजी आज बघुया. Prachi Phadke Puranik -
भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
जर वेगळ्या चवीची ही भेंडी मसाला खूप छान लागते. Deepa Gad -
-
-
-
चटपटीत भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार- भेंडी मसालासाप्ताहिक लंच प्लॅनर मधील तिसरी रेसिपी.आजची ही भेंडीची रेसिपी मी,थोडी वेगळी ढाबा स्टाईल पद्धतीने केली आहे.यातील मसाले,बेसन ,दही यांचे काॅम्बिनेशन भन्नाट लागते. Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrकमी साहित्यात आणि झटपट रेस्टॉरंट स्टाईल बनणारी भेंडी मसाला मला फार आवडते...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#बुधवार_भेंडी मसालाभेंडी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.आजची मसाला भेंडी दिप्तीच्या रेसिपी प्रमाणे करणार आहे,याधी सुध्दा मी केली होती.छान होते. Shilpa Ravindra Kulkarni -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#भेंडी #भाजीआजची भाजी ही काही फार स्पेशल नाही पण मी दिलेल्या पद्धतीने केल्यास अगदी हॉटेल मध्ये किंवा लग्नात आपण खातो त्या प्रकाराची पटकन् होणारी भाजी आपण घरी बनवू शकतो. भेंडी चिकट असते त्यामुळे ती नीट नाही झाली तर खायला मजा नाही येत.. या पद्धतीने भाजी केल्यास जराही चिकट होत नाही.Pradnya Purandare
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला. दिप्ती पडियार यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.मी यात कांदा लसूण मसाला थोडा घातला आहे. टोमॅटो असल्याने दह्याचे प्रमाण मी घेतले आहे. Sujata Gengaje -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr #रेस्टाॅरंट_स्टाईल_ग्रेव्ही #भेंडी_मसाला ( red gravy) कोरोनाने सगळ्या जगाला विळखा घातलाय.. त्यामुळे सगळ्या वरच बंधनं आलीत..बाहेर जाणे नाही,फिरणे नाही, रेस्टॉरंट नाही..घर एके घर..खाण्यावर नितांत प्रेम असलेली आपण मंडळी.. त्यामुळे जिभेला काहीतरी खमंग , चमचमीत हवेच असते अधूनमधून..चाह है तो राह है..बरोबर ना..आणि आपल्यासाठी वेगवेगळ्या theme घेऊन motivate करायला team Cookpad आली..मग काय चुटकीसरशी रेस्टॉरंट जैसा खाना घर पर ही..सब मुश्किले आसान हो गयी..🤩.. push लागतो हो जरा..😀आणि मग आपल्यातला शेफ जागा होऊन घरघरमें रेस्टॉरंट स्टाईल खाना पकने लगा..आणि अशाप्रकारे खवैय्यांची खवय्येगिरी चल रही है..😍 आताची थीम भेंडी ..😍..म्हणजे सदा सर्वकाळ favourite भाजी ..कशीही करा म्हणजे अगदी तेलावर मिरची मीठ घालून केलेली असो किंवा अगदी रेस्टॉरंट स्टाईल असो..म्हणूनच ये मौका हाथ से जाने न देना..😄..मग काय चला रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला कशी करायची ते पाहू.. Bhagyashree Lele -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#लंच#cooksnap#Dipti Pediyar#भेंडी मसालामी सहसा भेंडीची साधी भाजी बनवते. पण आज भेंडी मसाला करून बघितली, खूपच छान झाली. Deepa Gad -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ढाबा स्टाईल पनीर मसाला (dhaba style paneer masala recipe in marathi)
#पनीर#ढाबा Sampada Shrungarpure -
-
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी... Rajashri Deodhar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#कुकस्नॅप #Deepa Gad यांच्या भेंडी मसाला आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली खूप छान झाली आहे .😋😋👍 Rajashree Yele -
-
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही कॉन्टेस्ट चालू आहे भेंडी मसाला रेसिपी मी केली आहे नक्की करून पहा ढाबा स्टाइल भेंडी मसाला Smita Kiran Patil -
भेंडी मसाला.. (bhendi masala recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #बुधवार मला वाटते भेंडी हा सर्व भारतीय मनांचा जिव्हाळ्याचा विषय आहे..कुणालाही विचारा....भेंडीची भाजी मनापासून आवडते...कित्येक घरं मी बघितली आहेत..दर आठवड्याला फ्रीज मध्ये या भाजीची हजेरी असतेच..अगदी आवर्जून..काय जादू आहे या भेंडीत ते त्या निर्माणकर्त्यालाच माहित..उपरवाले ने बडी फुरसत से बनाया है भिंडी को..म्हणूनच माझ्यासारख्यांची भेंडी म्हणजे अगदी जान आहे.24×7 आवडणारी भाजी आहे आमच्या घरात..म्हणून या लाडक्या भाजीला दरवेळी नवनवा मेकप करुन तिला सजवते मी..आणि मग मोठया कौतुकाने देवाजीचे आभार मानत या लाडक्या भाजीचा आस्वाद घेतो आम्ही.. चला आज आपण भेंडीला मसाल्याचा मेकप करुन बघू या.. Bhagyashree Lele -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
मसाला भेंडी (Masala Bhendi Recipe In Marathi)
लहान मुलांना मस्त आवडणारी भाजी.टिफीन साठी तर एकदम उत्तम.:-) Anjita Mahajan -
शाही भेंडी मसाला (shahi bhendi masala recipe in marathi)
#rr शाही भेंडी मसाला ही मुघलाई किंवा उत्तर भारतीय डिश प्रकारात मोडणारी पाककृती आहे. Main course order करताना रोटी किंवा चपाती सोबत खायला म्हणून काजू करी मधली ही भेंडी, एक उत्तम side डिश म्हणून जमून जाते 🤤 सुप्रिया घुडे -
-
तिखट चटपटीत भेंडी ग्रेव्ही मसाला (bhendi gravy masala recipe in marathi)
पटकन व सेम रेस्टॉरंट सारखी बनणारी भेंडी ग्रेव्ही मसाला. कसा करणार ते पाहू.#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
ढाबा स्टाइल मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#भेंडीभाजी#भेंडीलेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. बुळबुळीत आणि चिकट असल्यामुळे बरेच लोकांना भेंडी आवडत नाही पण भेंडीच्या या भाजीचे फायद्यांना जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल भेंडीला आपल्या ताटात सामील करून तुम्ही कँसरला पळवू शकता. खास करून कोलन कँसरला दूर भेंडी हाय फायबर भाजी आहे त्यामुळे पचायला सोपी जातेइम्यून सिस्टम - भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे एंटीआक्सिडेंटने भरपूर असते. ज्यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबूत करून शरीराला आजारांपासून लढण्यास मदत करते. याला भोजनात सामील केल्याने बरेच आजारपण जसे खोकला, थंडीचा त्रास कमी होतोलहान मुलांना भेंडी खूप आवडते वेगवेगळ्या पद्धतीने भेंडी तयार केली जातेभेंडी बनवण्याची पद्धत जर चांगली असेल ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना ही भेंडी आवडेलअशा प्रकारची भेंडी मी मुंबई-अहमदाबाद हायवे वर काठेवाडी ढाबे आहे तिथे अशा प्रकारची भेंडी मे बऱ्याचदा खाल्लेली आहे.मी तयार केलेले भेंडी ढाबा स्टाइल मसाला भेंडी आहेरेसिपी तून नक्कीच बघा धाबा स्टाइल मसाला भेंडी Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या