वांग्याचे भरीत कांद्याची पात घालून (Vangyache Bharit Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#NVR #खान्देशा मध्ये अशा प्रकारचे भरीत बनवतात. कांद्याच्या पातीमुळे भरताला वेगळीच चव येते. हरव्या बिया नसलेल्या व वजनाने हलक्या असलेल्या वांग्यापासून हे भरीत बनवतात. या वांग्याना जळगावची वांगी असेही म्हणतात. पहा कसे बनवले ते.आज चंपाशष्टी असल्याने हे भरीत केले आहे.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 2मोठ्या आकाराची हिरवी वांगी
  2. 1जुडी कांद्याची पात
  3. 6-7हिरव्या मिरच्या
  4. 7-8लसूण पाकळ्या
  5. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  6. 1 टेबलस्पूनराई
  7. 1 टेबलस्पूनजिरें
  8. 1/2 टेबलस्पूनहिंग
  9. 1/2 टेबलस्पूनमीठ
  10. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    वांगी स्वच्छ धुऊन सुरीने त्याला टोचे मारून घ्यावेत. कांद्याची पात धुऊन बारीक चिरुन घ्यावी.मिरच्या परतुन लसूण घालून पेष्ट करून घ्यावी.

  2. 2

    वांग्याला तेलाचा हात लावून गॅसवर भाजून घ्यावीत. तव्यावर पण भाजता येते. गावी चुलीवर ही भाजून घेतात. तुम्हाला ज्या प्रकारे वांगी भाजून घेता येतील त्या प्रमाणे भाजून त्याची साले काढून घ्यावी.

  3. 3

    साल काढलेली वांगी स्मशरने स्मॅश करून घ्यावीत

  4. 4

    गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल ओतून ते तापल्यावर त्यात फोडणीचे साहित्य घालून ते तडतडल्यावर त्यात शेंगदाणे टाकून परतुन कांद्याची पात घालून परतून घ्यावी.त्यात लसूण मिरचीची पेस्ट घालावी.

  5. 5

    परतलेल्या पातित स्मॅश केलेलं वांग घालून मीठ घालून सर्व मिक्स करून चांगले परतुन घ्यावे.

  6. 6

    वांग्याचे भरीत सर्व्ह करायला तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Similar Recipes