चाकवत (Chakvat Recipe In Marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

# कुकपॅड
#ताकातील चाकवत

चाकवत (Chakvat Recipe In Marathi)

# कुकपॅड
#ताकातील चाकवत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5 व्यक्तीसाठी
  1. 1 जुडी चाकवत
  2. 1 ग्लासताक
  3. 1/4 कपशेंगदाणे
  4. 1/4 कपचणा डाळ
  5. 3हि.मिरच्या
  6. 1/2 टिस्पून हिंग
  7. 2 टिस्पून मीठ
  8. 1 टिस्पून जीरे
  9. 10/ बारा पाकळ्या लसुण
  10. 3 टे. स्पुन बेसन पीठ
  11. 2 टे. स्पुन फोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चाकवत निवडुन स्वच्छ धुवून घ्यावेत.
    चणा डाळ आणि शेंगदाणे अर्धा तास भिजत घालावे.नंतर चाकवत आणि भिजवलेले चणाडाळ आणि शेंगदाणे कुकर ला तीन शिट्टी देऊन काढावे.

  2. 2

    दिलेल्या ताकात बेसन घालून मिश्रण एकजीव करावे.

  3. 3

    पातेल्यात तेल गरम करून ‌जीरे,हिंग ची फोडणी करावी.त्यात लसुण मिरची ची पेस्ट घालून मिश्रण परतावे.नंतर यात बेसनाचे ताक घालून चांगले ढवळावे.एक उकळी आणावी.

  4. 4

    मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात शिजवलेली चणाडाळ आणि शेंगदाणे घालून मिश्रणाला उकळी आणावी.

  5. 5

    शिजवलेला चाकवत थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे.आणि ताकाच्या मिश्रणात मिक्स करावे.

  6. 6

    चवीनुसार मीठ घालावे.आणि भाजी एकजीव करून मंद‌ आचेवर शिजू द्यावे.

    टिप - या भाजीत आपल्या आवडीनुसार गुळ हि वापरु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes