साधं वरण -भात (Varan Bhat Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#DR2
रात्रीच्या जेवणासाठी हलकंफुलकं साधं वरण भात चटणी लोणचं पापड हा अतिशय चविष्ट व सगळ्यांचाच प्रिय मेनू आहे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

25मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीचा आंबेमोर तांदळाचा साधा भात
  2. 1/2 वाटीमूग डाळ,अर्धी वाटी तूर डाळ शिजवून घेतलेली
  3. 1/2 चमचाहळद,पाव चमचा हिंग
  4. 1 चमचाजिर कुटलेल
  5. चवीनुसारमीठ
  6. 3 चमचेसाजूक तूप

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    शिजलेल्या डाळीमध्ये हळद हिंग मीठ व कुटलेले जिरं घालून छान घोटून घ्यावं व लागेल तसं पाणी घालून सारखं करावं

  2. 2

    मग हे मिश्रण गॅसवर उकळत ठेवावं उकळत आलं की त्यामध्ये साजूक तूप घालावं वाजून दोन मिनिटांसाठी उकळावं व गॅस बंद करावा

  3. 3

    माझ्या सासुबाई कडून मी शिकले अतिशय टेस्टी लागतं त्यात जिरं घातल्यामुळे अतिशय सुंदर चव येते साधं वरण भात त्यावर लिंबू पिळावा त्याबरोबर तळलेला पापड लोणचं व चटणी हे खाल्लं तरी खूप टेस्टी व पोटभरीचा असं जेवण होतं

  4. 4

    कुठूनही दमून आलो की बाहेरचं खाण्यापेक्षा गरम गरम वरण भात खाल्ला की मन समाधानी होतं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes