पाचक अंबिल (Pachak Ambil Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#TGR
संक्रांतीला ऋतू बदलतो. हवामानात फरक होतो . अशावेळी अंबिल बनवितात. अंबिल सेवन केल्याने , शरिराला खूपच लाभ होतो . ते पाचक ,व थंड असतं . सोपं , साधं व पचायला हलकं .. असं अंबिल बनविलं आहे . तुम्ही पण बनवून त्याची चव पहा आणि तंदरुस्त रहा ., चला कृती पाहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 व्यक्ती
  1. 2 कपघट्ट दही
  2. 1 टेबलस्पूनज्वारीचे पीठ
  3. 3-4 इंचआलं
  4. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    ज्वारीचे पीठ एक कप पाण्यात घालून त्याची पेस्ट तयार करा.
    गॅसवर अडीच कप पाण्याचे आधण ठेवा. पाण्याला आधण आल्यानंतर, त्यांत ज्वारीच्या पिठाची पेस्ट टाका.

  2. 2

    गॅसवर पेज एक सारखी ढवळत रहा.त्यात चवीपुरते मीठ टाका.
    मिक्सरवर आल्याची पेस्ट तयार करा.त्यांत थोडे पाणी टाकून आणखीन थोडे फिरवा. ते पाणी गाळून घ्या.

  3. 3

    गार झालेली पेज, दही, आल्याचा रस टाकून मिश्रण ब्लेंडर ने घुसळा. अंबिल तयार !!

  4. 4

    मस्त पाचक व शरीराला थंडाई देणारे अंबिल तयार !!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes