कोबी चीज चा पराठा (Kobi Cheese Paratha Recipe In Marathi)

SHAILAJA BANERJEE
SHAILAJA BANERJEE @cook_30670007

#PBR रोज रोज भाजी पोळी खायचा कंटाळा येतो तेव्हा चटपटीत पराठा हे छान पदार्थ आहे जो सगळ्यांना खुप आवडतो. खूप प्रकारचे चविष्ट पराठे बनवता येतात. आज आपण कोबीचा चिज घालून पराठा बनवू या.

कोबी चीज चा पराठा (Kobi Cheese Paratha Recipe In Marathi)

#PBR रोज रोज भाजी पोळी खायचा कंटाळा येतो तेव्हा चटपटीत पराठा हे छान पदार्थ आहे जो सगळ्यांना खुप आवडतो. खूप प्रकारचे चविष्ट पराठे बनवता येतात. आज आपण कोबीचा चिज घालून पराठा बनवू या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 मोठी वाटी बारीक चिरलेला कोबी
  2. 2 मोठी वाटी कणिक
  3. मूठभरबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 5/6हिरवी मिरची बारीक चिरलेली
  5. 4/5लसूण पाकळ्या बारीक चिरलेली
  6. 1 टेबल स्पूनधना जीरा पावडर
  7. 1 टी स्पूनतीळ
  8. 1/2 टी स्पूनओवा
  9. 1/2हळद
  10. चवी नुसारमीठ
  11. पाणी
  12. तूप मोहन साठी आणि वरून लावायला

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    सर्वात प्रथम कोबी,कोथिंबीर,मिरची,लसूण बारीक चिरून घ्यावेत. पराती मध्ये पीठ,कोबी लसूण, मिरची, कोथिंबीर,तीळ, ओवा क्रश करून, हळद व मीठ घालून हलवावे. त्यावर 2 मोठें चमचे गरम तूप घालावे आणि पीठ भिजवावे. पाण्याचा वापर खूप कमी करावा. पीठ पाच मिनिट झाकून ठेवावे.

  2. 2

    तवा गॅस वर गरम करायला ठेवावा. आता एक मोठा गोळा पीठ घेऊन पराठा लाटा. पोळी पेक्षा पराठा जरा जाड असतो. दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यावं आणि उतरते वेळी तूप लावावे. वरून चीझ ग्रेट करून घालावे. मी स्लाइस चीझ वापरला आहे.

  3. 3

    चला तर गरमा गरम पराठे तयार आहेत खाण्यासाठी. तुम्ही हे पराठे टोमॅटो सॉस किंवा चटनी बरोबर किंवा नुसतेच खाऊ शकता. हे पराठे खूपच टेस्टी लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SHAILAJA BANERJEE
SHAILAJA BANERJEE @cook_30670007
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes