मटार पोहे (Matar Pohe Recipe In Marathi)

SHAILAJA BANERJEE
SHAILAJA BANERJEE @cook_30670007

#MR

मटार पोहे (Matar Pohe Recipe In Marathi)

#MR

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपजाडे पोहे
  2. 3कांदे
  3. 1/2 कपमटार
  4. 2हिरवी मिरची
  5. 7/8कडीपत्ता
  6. कोथिंबीर
  7. 1 टी स्पूनराई
  8. 1/2 टी स्पूनहळद
  9. चवी नुसारमीठ व साखर
  10. ओले खोबरं चवी नुसार
  11. 1/4 टी स्पूनहिंग
  12. लिंबू रस
  13. 4 टेबल स्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    प्रथम पोहे स्वच्छ निवडून धुवून घ्यावे.

  2. 2

    कांदा,हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेणे.

  3. 3

    पातेले गॅसवर गरम करून त्यात तेल घालावे. त्यात राई कडीपत्ता मिरची हिंग हळद घालून फोडणी करावी. त्यावर कांदा घालावा व मीठ घालून छान हलवावे. आता त्यात मटार घालून वाफेवर शिजवून घ्यावे.

  4. 4

    मटार शिजले की त्यात पोहे घालून हलवावे. झाकण घालून शिजू द्यावे. नंतर थोडा लिंबू रस व साखर घालावी.
    कोथिंबीर व खोबरे घालून सर्व्ह करावे.

  5. 5

    चला तर आपले कांदा पोहे मटार घालून तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SHAILAJA BANERJEE
SHAILAJA BANERJEE @cook_30670007
रोजी

Similar Recipes