फणसाची भाजी (Fanasachi Bhaji Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BR2
कोवळ्या फणसाची भाजी खूप सुंदर होते व खूप टेस्टी लागते

फणसाची भाजी (Fanasachi Bhaji Recipe In Marathi)

#BR2
कोवळ्या फणसाची भाजी खूप सुंदर होते व खूप टेस्टी लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोकोवळा फणस साल काढून त्याच्या फोडी केलेल्या
  2. 1टोमॅटो, एक कांदा बारीक चिरलेला
  3. 6लसूण एक इंच आलं बारीक कुटलेलं
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. चमचाहळद दीड चमचा तिखट एक चमचा गोडा मसाला
  6. चवीनुसारमीठ सुपारी एवढा गुळ
  7. कोथिंबीर
  8. 1/2 चमचाजीरे अर्धा चमचा मोहरी चिमूटभर हिंग
  9. 10कढीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम फणसाच्या फोडी पाण्यामध्ये घालून ठेवाव्या गॅसवर भाजीचा कुकर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी जिरं कढीपत्ता यांची खमंग फोडणी करावी

  2. 2

    त्यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण घालून छान परतावे मग हळद तिखट मसाला मीठ व गूळ घालून छान परतावे व त्यामध्ये पाण्यात ठेवलेल्या फणसाच्या फोडी घालून बुडेल इतपत पाणी घालावे व झाकण लावून चांगल्या पाच ते सहा शिट्ट्या होऊ द्याव्या

  3. 3

    कर थंड झाला की झाकण काढून फणस शिजलाय का तो पहावा व त्यावर कोथिंबीर भुरभुरावी व चपाती किंवा पराठ्याबरोबर खावे ओलसर आवडत असल्यास त्यात थोडं खोबरं वाटून लावावं ही भाजी खूप टेस्टी व पौष्टिक अशी आहे या दिवसात फणस सुंदर मिळतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes