कुकिंग सूचना
- 1
तूर डाळ व हरभरा डाळ पाण्यात भिजत घातल्या मिक्सरमधून डाळी,अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचे तूकडे, कोथिंबीर काड्या वाटून घेतले
- 2
त्यात मिठ घालून मिसळवले व मिश्रणाचे गोळे बनवून घेतले
- 3
एक वाटी दह्यात बेसन घालून मिसळवले, पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी,मेथीं दाणा, हिरवी मिरचीचे तूकडे, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता घालून त्यात दही-बेसन मिश्रण ओतून आवश्यक गरम पाणी टाकून उकळवून कढी बनविली
- 4
कढीला एक उकळी घेऊन त्यात गोळे टाकून गोळे शिजे पर्यंत कढीला उकळवून घेतले,कोथिंबीर घालून वाढले. पोळी, भाकरीबरोबर छान लागतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR घरात लहानपणी आजी कढी गोळे करायची मला आजही आठवते गरम वरण भात आणि कढी गोळे झक्कास चव यायची..तीच रेसिपी आणि काही टिप्स शेअर करत आहे. साधं वरण आणि कढी गोळे एकत्र करून पोळी भाताबरोबर खायची मज्जा काही औरच असते.... Rajashri Deodhar -
पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची कोफ्ता करी (कढी गोळे) (kadhigole recipe in marathi)
कढी गोळे ही महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक ,पारंपरिक फेमस डिश आहे. पण आधुनिक भाषेत कढी गोळ्यांना कोफ्ता करी म्हणता येईल. नेहमीच्या जेवणातील वरण भात भजीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास आठवण येते ती कढी गोळ्याची. कढी गोळे ही चविष्ट डिश महाराष्ट्रात विदर्भ, खान्देश , मराठवाड़ा आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. विदर्भात हरभरा डाळ, तूर किंवा मुंग डाळ किंचित जाडसर वाटून घेऊन, त्यात हळद-मीठ-मिरची, जिरे, लसुन, कोथिंबीर टाकून त्याचे गोळे करुन ते वाफवून किंवा तळून घेतात आणि मग कढीला उकळी आल्यावर त्यात सोडतात. कढी आत मुरत असल्यामुळे या कढी-गोळे कढी-पकोडे ची चव एकदम खतरा असते. मी आज विदर्भातील पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची स्वादिष्ट ,चविष्ट कोफ्ता करी( कढी गोळे) बनविण्याची पद्धत सांगणार आहे. Swati Pote -
-
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#KS4#कढी गोळेखानदेश मध्ये कढी गोळे म्हणजे स्पेशल डिश समजतात.खास लोकांची फर माईश असते आम्ही येतो कढी गोळे चां च बेत करा.अतिशय स्वादिष्ट अशी ही खानदेशी डिश आमच्या कडे पण सर्वांना आवडते. Rohini Deshkar -
कढी गोळे (kadi gole recipe in marathi)
हिवाळ्यात बाजारात भरपूर तुरीच्या शेंगा येतात.तेव्हा नवीन नवीन काहीतरी.:-) Anjita Mahajan -
-
-
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
Prachi Manerikae कढी गोळे रेसिपी बघितली या आधी पणी कडी गोळे केले होते ते पण माझी ती रेसिपी फसली मजा म्हणजे कढि उकळायला लागली कि गोळी टाकायचे तर उळण्या आधीच त्याच्यात गोळे टाकले तर ते सगळे माझे विरघळले पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळे कढीगोळे खूप छान झाले सर्वाना खूप आवडले फक्त मी त्याच्यात एक बदल केला की मी बेसन भिजवून गोळे प्रथम एक मिनिट मायक्रोवेव केले केले. Deepali dake Kulkarni -
-
कढी वडा (kadhi vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझा आवडता पदार्थ 2 कढी वडा आईच्या हातचा खूप आवडतो. आईकडे गेले की आई अगदी आवर्जून करते. shamal walunj -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GRकढी गोळे मला आवडतात पण मला माझ्या सासुबाई सारखे जमत नाही.आज प्रयत्न केला आहे त्यांना विचारून घेतले.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#गावरान रेसिपी कॉन्टेस्ट#कढी गोळेगावरान म्हटलं की,गाव आठवत चुलीवरचा मस्त जेवणाचा बेत आठवतो.त्या वातावरणात अस्सल गावची मज्जाच वेगळी असते.विदर्भात काही पदार्थ ही खास असतात जसे की, कढी गोळे चुलीवर केलेले...अहहा....तोंडाला पाणी सुटले हो ना....काही हरकत नाही सध्या गावात जरी नसलो तरीही त्याच पद्धतीने मातीच्या भांड्यात केलेले अतिशय पौष्टिक असा पदार्थ उपावस असला की, आई नेहमी कढी गोळे करायची त्यावर वरून लाल मिरचीच्या फोडणी ची धार घातलेले तेल.... कांदा,लसूण विरहित पण तितकेच चविष्ट... कढी गोळेही रेसिपी माझ्या आईची आहे.नेहमी केली की, माझा तिला फोन जातो....अगदी तुझ्याच सारखे झालेत.....तुम्हीही नक्की करून पहा... मातीच्या भांड्यात त्याची चव काही वेगळीच..गावाच्या मायेची... Shweta Khode Thengadi -
-
-
कढी गोळे रेसिपी (kadi goda recipe in marathi)
#लंच #कढी गोळे रेसिपी तुरीच्या हिरव्या दाण्याची चे गोळे करण्यात आले व कडी बनवून त्यात सोडण्यात आले रेसिपी छान टेस्टी आहे Prabha Shambharkar -
काजु करी (kaju curry recipe in marathi)
# काजु करी हा एक भाजी प्रकारातील रुचकर प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
-
कढि गोळे (विदर्भ स्पेशल) (kadhi gole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट -3 #पावसाळी गंमत ....पावसाळ्यात जसे भजे खाण्याची मजा वाटते तसेच पावसाळ्यात जेवणात गरमागरम कढि प्यायला मजा येते ...आणी जर त्यात गोळे असतील ती अजूनच लज्जत दार वाटते .... Varsha Deshpande -
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#Kadhigoleप्रोटीन आणि व्हीटॅमीन सी चा स्त्रोत असलेले कढी गोळे , नाव जरी निघाले तरी जिभाई चटकावते अशी हि डिश कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
-
कढी गोळे (kadi gole recipe in marathi)
#KS3 थीम ३ : विदर्भ, रेसिपी ४"कढी " ही रेसिपी तर सर्वच बनवितात. पण खास"कढी गोळे " ही रेसिपी विदर्भाची खासियत. तर मग ही खासियत आपण अनुभवलीच पाहिजे हा माझा अट्टाहास. म्हणून ही रेसिपी करण्याचा प्रयत्न.. आणि ती आवडलीही..🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR जेव्हा घरात ताजी भाजी उपलब्ध नसेल तेव्हा करता येण्या जोगा अगदी सोपा आणि चविष्ट पदार्थ म्हणजे कढी गोळे गरम गरम भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर छानच लागतात Sushama Potdar -
-
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR कढी गोळे ही चवदार विदर्भाची खास पाककृती आहे. कढी गोळे हे आंबट दही किंवा ताक आणि हरभरा पिठाचे किंवा चना डाळ , तुरदाळ पकोडा आणि काही मसाले घालून ही पाककृती बनवली जाते. कढी गोळे हे भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खूप छान लागते. कढीगोळे ही रेसिपी महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच विदर्भ भागातील पारंपारिक रेसिपी आहे. घरच्या साहित्यात, पुरेशा साहित्यात, सहज व सोपी पाककृती, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी चविष्ट लागते आणि कमी वेळात तयार होते. कधी भाजीला काही नसेल तर सहज आणि सोप्या पद्धतीने कढी गोळे बनविता येईल. विदर्भामध्ये ही रेसिपी विशेष आहे आणि खेडेगावात विशेष करून ही रेसिपी बनविली जाते. कढी गोळे असेल तर आणखी कुठल्याही भाजीची आवश्यकता नसते. Archana Gajbhiye -
टोफू मोदक करी
#करी#बुक ४#masterclassखूप सोपी आणि मस्त ग्रेव्ही बनते नेहमीसारखं सारण न बनवता मोदक हेल्दी बनवायचा प्रयत्न केला आणि चवीला अतिशय छान झाले... savi bharati
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11040895
टिप्पण्या